Anant- Radhika Wedding Food Menu List Saam TV
मनोरंजन बातम्या

Anant-Radhika Wedding Menu: महाराष्ट्रीय ते मेक्सिकन अन् काशीचा चाटवालाही; अनंत-राधिकाच्या लग्नातील मेनू वाचून चाट पडाल

Chetan Bodke

अवघ्या काही तासांतच राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आज संध्याकाळी सप्तपदी घेणार आहेत. या लग्नासाठी देशासह परदेशातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. लग्नासाठी हॉलिवूड- बॉलिवूडपासून ते राज्यासह देशातील प्रमुख राजकीय नेते आणि उद्योग क्षेत्रासह क्रिडा जगतातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विदेशातूनही अनेक पाहुणे या लग्नात सहभागी होणार आहेत.

अनंत- राधिकाचं लग्नाचा ग्रँड वेडिंग बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहे. या लग्नासाठी अंबानी मॅनेजमेंटकडून खास थीम वापरली आहे. 'भारतीय शाही लग्न' अशी आजची लग्नाची थीम असेल. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी परफॉर्मन्स करणार आहेत. यामध्ये, सलमान खान, रणवीर सिंह, बादशाह, करण औजालासह अनेक सेलिब्रिटी यावेळी परफॉरमन्स सादर करणार आहेत. यावेळी काही हॉलिवूड सेलिब्रिटीही परफॉरमन्स सादर करणार आहेत.

लग्नामध्ये पाहुण्यांसाठी जगभरातील वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये 2,500 हून अधिक पाककृतींचा समावेश आहे. या लग्नासाठी ‘काशी चाट भंडार’लाही खास बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पाहुण्यांना टोमॅटो चाट आणि मद्रासी कॉफीची चव चाखायला मिळेल. नीता अंबानी स्वतः लग्नाचा संपूर्ण मेन्यू पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी यांनी आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना सेवा देण्यासाठी एका इंडोनेशियन कॅटरिंग कंपनीची निवड केली आहे. मेनूमध्ये खोबऱ्यापासून बनवलेल्या 100 हून अधिक पदार्थ असणार आहेत.

लग्नाची वरात दुपारी ३ वाजल्यापासून सुरू झाली आहे. लग्नाच्या मिरवणुकीत पाहुण्यांना भारतीय पोशाख असून अनेक मान्यवरांना फेटेही बांधले जाणार आहेत. रात्री ८ च्या सुमारास राधिका- अनंत यांचा वरमाला समारंभ पार पडणार आहे तर रात्री ९:३० वाजेनंतर लग्नाच्या इतर विधींना सुरुवात होणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान १३ जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान शनिवारी, १३ जुलै रोजी बीकेसीमध्ये काही कार्यक्रमांच्या उद्घाटनाला येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT