28 Years later Movie Poster Google
मनोरंजन बातम्या

28 Years Later : फक्त रील्सच नाही तर हा आंतराष्ट्रीय चित्रपट देखील केला आयफोनवर शूट; बघून व्हाल थक्क

28 Years Later iphone shoot : २८ इयर्स लेटर या बहूप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या चर्चा सुरु आहेत. या चित्रपटाची कास्ट आणि कलाकारांसोबतच हा चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

28 Years Later : २८ इयर्स लेटर या बहूप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. डॅनी बॉयल दिग्दर्शित आगामी झोम्बी एपोकॅलिप्स २००२ साली प्रदर्शित झालेल्या 28 डेज लेटर या चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटात जोडी कॉमर, ॲरॉन टेलर-जॉन्सन आणि राल्फ फिएनेस आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटातील कलाकार आणि कथेसह हा चित्रपट आयफोनमधून चित्रित करण्यात आल्यामुळे अधिक चर्चेत आहे.

डॅनी बॉयल यांचा बहुप्रतिक्षित २८ इयर्स लेटर हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे. सेटवरील छायाचित्रांमध्ये हे लक्षात आले. नंतर, चित्रीकरण करणाऱ्या काही कलाकारांनी या चित्रपटातील अनेक भाग आयफोन १५ प्रो मॅक्स मधून चित्रित करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

हा चित्रपट शूट करताना आयफोन एका खास बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता. ज्याला नंतर लेन्स जोडण्यात आले. असे बॉक्स आणि अ‍ॅडॉप्टर्स बीस्टने बनवले आहेत आणि त्यांची उत्पादने त्यांच्या विशिष्ट लाल हँडलद्वारे ओळखली जातात. डीओएफ (डेप्थ ऑफ फील्ड) अ‍ॅडॉप्टर्समुळे स्मार्टफोनमध्ये फुल-फ्रेम डीएसएलआर लेन्स जोडता येऊ शकतात. लेन्सच्या आकाराचे अ‍ॅडॉप्टर्स डीएसएलआर लेन्समधील फोटो स्मार्टफोन स्क्रीनवर प्रोजेक्ट करतात आणि स्मार्टफोन हे प्रोजेक्शन रेकॉर्ड करतो.

दरम्यान, आयफोनचा वापर करून अनेक आर्ट-हाऊसने चित्रपट बनवले आहेत, ज्यामध्ये शॉन बेकरचा टँजेरिन आणि स्टीव्हन सोडरबर्गचा अनसेन या चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट कमी बजेटचे आणि मर्यादित रिलीजचे होते. परंतु, २८ इयर्स लेटर चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार ७५ दशलक्ष डॉलर्स बजेट असलेला आगामी चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT