Youtuber Death: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमध्ये राहणारी २१ वर्षीय युट्यूबरचा मृत्यू झाला आहे हैदराबादमधील मणिकोंडा येथे बीएससीच्या शिक्षणासाठी ती ११ महिन्यांपासून हैदराबादमध्ये एकटी राहत होती. मृत बोनू कोमाली ही तरुणी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. संशयास्पद मृत्यू आणि आत्महत्या अशा दोन्ही प्रकारे पोलिस तपास करत आहेत.
रायदुर्गम पोलीसांच्या म्हणण्यानुसार, कुवेतमध्ये काम करणाऱ्या बोनू कोमालीची आई आई बी. सत्य वरलक्ष्मी यांना सोमवारी रात्री १:३४ वाजता 'आय लव्ह यू मम्मी. जागरथा. थम्मुदिनी बागा चुसुको' (आय लव्ह यू मम्मी. काळजी घे. माझ्या धाकट्या भावाची चांगली काळजी घ्या) असा मेसेज आला. त्यानंतर तिच्या आईने तिला अनेक वेळा फोन केला, परंतु तिने कॉल उचलला नाही त्यामुळे आईची चिंता वाढली.
तिने हैदराबादमधील तिच्या ओळखीच्या लोकांना माहिती दिली. जेव्हा ते मणिकोंडा येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना दरवाजा आतून बंद आढळला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचले, दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांना कोमालीचा मृतदेह घराच्या पंख्याला लटकलेले आढळले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.
पोलिस तपास आणि निष्कर्ष
रायदुर्गम पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की बोनूने आत्महत्या केली आहे. २७ वर्षीय युट्यूबर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरशी असलेल्या दीर्घकाळाच्या प्रेमसंबंधात झालेल्या वादामुळे भावनिक त्रास सहन न झाल्याने तिने हे ठोकाचे पाऊल उचलले. दोघांनी त्यांचे तीन वर्षांचे नाते संपवले होते. या निर्णयाचा तिच्यावर गंभीर परिणाम झाला. बोनूने यापूर्वी सहा महिन्यांपूर्वी याच कारणामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता असेही पोलिसांनी उघड केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.