Pune Crime Yandex
क्राईम

Pune Crime: मुलीला अपशब्द वापरले, संतापलेल्या नातेवाईकाच्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू; बिबेवाडीतील खळबळजनक घटना

Youth Killed In Bibwewadi: पुण्यामध्ये बिबेवाडीत एका तरूणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. क्षुल्लक कारणातून तरूणाची हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Rohini Gudaghe

Pune Crime News

पुण्यामध्ये बिबेवाडीत ( Bibwewadi) एका तरूणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. क्षुल्लक कारणातून तरूणाची हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ (Youth Killed In Bibwewadi) या. नातवाईकाच्या मुलीला अपशब्द वापरल्यामुळे संतापून तरूणाला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गंभीर जखमी होवून तरूणाचा मृत्यू झाला आहे. (Latest Crime News)

पुण्यात बिबवेवाडीत तरुणाचा खून (Youth Killed) झाला आहे. ही घटना काल सकाळी (२५ मार्च) रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नातेवाइकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून या तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कशी घडली घटना?

बसवराज चिदानंद गजंत्रे (वय २६, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस (Pune) तपास करत आहे़त. नातेवाइकाच्या मुलीबाबत (Pune Crime) अपशब्द वापरले.

त्यामुळे संतापून संबंधित नातेवाईकाने मृत तरूणाल बसवराज याच्या डोक्यात लोखंडी पाइप आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीमध्ये बसवराज गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू (Pune Crime News) झाला. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

अहमदनगरमधील घटना

अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली ( Crime News) होती. सुनील लांडगे, असं आरोपीचे नाव आहे. मृत पत्नीचं नाव लीलाबाई लांडगे आहे.साक्षी लांडगे आणि खुशी लांडगे या दोन मुलींचाही आगीत होरपळून मृत्यू झालाय.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या प्रकरणी आरोपीला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तो मागील काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.नयावरून दोघांमध्ये आतापर्यंत अनेकवेळा भांडणं झाली होती. वाद विकोपाला जाऊन त्याने रागाच्या भरात पत्नीची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

New Highway: २४२०० कोटींचा महामार्ग, ४ राज्यातून जाणार; मोदी सरकारचा मास्टरप्लान, कुणाला होणार फायदा?

एका महिन्यात कंबरेपर्यंत वाढतील तुमचे केस, हा देसी उपाय करून बघा

Shocking : नवी मुंबईत भयंकर घडलं! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर

SCROLL FOR NEXT