youth from malkapur buldhana passed away four injured in a road accident saam tv
क्राईम

Akola Accident News : मित्राच्या लग्नाला गुजरातहून आलेल्या कारला अकाेल्यात अपघात, एकाचा मृत्यू, चाैघे जखमी

या अपघातामधील लाेक हे परराज्यातून येत हाेते. या अपघातामधील जखमींना मुर्तीजापुर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- अक्षय गवळी

Akola News :

अकाेला जिल्ह्यात कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यु झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहे. (Maharashtra News)

अकोला येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. ही घटना अकोला जिल्ह्यातील माना येथे घडली. चारचाकी वाहनात प्रवास करणारी लोक मित्राच्या लग्नाला गुजरातहून वरुडकडे निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली.

या अपघातात वाहन चालक धीरज वैराळे (राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना मुर्तीजापुर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विनोद गडारी, मंगल पवार, शिवप्रताप तिवारी (रा.धुळे) आणि सागर विश्वेश्वर उमाळे (रा. तिगाव मारू, पांधूर्णा, मध्यप्रदेश) असं कारमधील जखमींची नावे आहेत. जखमी आणि मृतक तरुण हे सर्व मित्र असून एका कंपनीत कामाला होते.

कंपनीत असलेल्या मित्राच्या लग्नाला जात असताना ही अपघाताची घटना घडली आहे. अपघाताची माहिती समजताच आज पहाटेच मृतक आणि जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालय गाठले.

या अपघाताची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज सुरोशे हे घटनास्थळी दाखल झाले अन् अपघाती वाहनांना नागरिकांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून विस्कळीत झालेले वाहतूक सुरळीत केली आहे.

दरम्यान या अपघाता प्रकरणी ट्रक चालक एकनाथ वामन महाजन (वय ४५ वर्ष, रा. नाने, ता.जिल्हा धुळे) याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT