Crime News Saam TV
क्राईम

Crime News: एक्स बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी तरुणीने केलं भयंकर कृत्य; ८ लाख रुपये गेल्याने आता होतोय पश्चाताप

Witchcraft News: एका तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी 8.2 लाख रुपये गमावले आहेत. तरुणी आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा हा निर्णय दोघांच्याही कुटुंबीयांना मान्य नव्हता.

Ruchika Jadhav

Witchcraft For Ex Boyfriend:

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र आपल्या आजूबाजूला प्रेमाच्या जाळ्यात फसलेल्या व्यक्ती अनेक विचित्र गोष्टी करतात. एखाद्या व्यक्तीला संपूर्ण जीवन पणाला लावतात. यामध्ये त्या व्यक्ती स्वतः त्रस्त होतात आणि इतरांनाही त्रास देतात. अशात बंगळुरू येथून अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे.

एका तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी 8.2 लाख रुपये गमावले आहेत. तरुणी आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा हा निर्णय दोघांच्याही कुटुंबीयांना मान्य नव्हता. त्यामुळे दोघांचं ब्रेकअप झालं होतं. आपल्या प्रियकराला तरुणी विसरू शकत नव्हती. प्रेमात ती इतकी बुडाली होती की, तिने जादूटोणा सारख्या अंधविश्वासाचा मार्ग अवलंबला.

तरुणीने ऑनलाईन पद्धतीने काही ज्योतिष असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधला. सुरुवातीला तिला 501 रुपये दक्षिणा देण्यास सांगितले. त्यावर ढोंगीबाबाने तिला सांगितले की, तुझ्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारातील व्यक्ती तुमच्यावर काळीजादू करत आहे. त्यामुळे तुमच्या लग्नात या अडचणी येत आहेत. यावर उपाय केल्यास या समस्या दूर होतील. तरुणीला ढोंगीबाबाच्या बोलण्यावर विश्वास बसला.

त्याने तिला तिच्या मित्रांचे आणि कुटुंबीयांचे फोटो मागितले. त्यानंतर आधी 3 लाख आणि नंतर 4 लाख असे थोडेथोडे करून तब्बल 8 लाख रुपये तिच्याकडून उकळण्यात आले. तरुणीला संशय आल्यावर तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर ढोंगीबाबाने तिला धमकी देण्यास सुरुवात केली.

घडलेला प्रकार तिने आपल्या कुटुंबियांना सांगितला. ही माहिती मिळताच तरुणीच्या आई बाबांनी जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस आता या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT