Yavatmal Ex MLA Fortuner Broke Saam Tv News
क्राईम

'हे शेत आमचं आहे, तुम्ही पेरणी करु नका'; शेतजमिनीचा वाद टोकाला, माजी आमदाराची फॉर्च्युनर कुऱ्हाडीने फोडली

Yavatmal Ex MLA Fortuner Broke : सचिन भिमराव पंचरे (वय ३५, रा. दुर्भा) यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची १४ एकर शेती वार्षिक ७०,००० रुपये दराने तीन वर्षांसाठी ठेक्यानं घेतली आहे. त्यासाठी त्यांच्याकडे अधिकृत पोचपावती देखील आहे.

Prashant Patil

यवतमाळ : आमदार, खासदार म्हटलं की बड्या महागड्या आणि अलिशान गाड्या आल्या. मात्र, आमदाराच्या कारवर कुऱ्हाडीने वार करण्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. झरी जामनी तालुक्यातील दुर्भा येथे ठेक्याने घेतलेल्या शेतात पेरणीवरून वाद झाला. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांची फॉर्च्युनर कार शेतात उभी होती. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले असता संशयित आरोपीने कुऱ्हाडीच्या सह्याने या फॉर्च्युनर वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्यात, कारचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलीस अधिक तपास करत आहेत.

सचिन भिमराव पंचरे (वय ३५, रा. दुर्भा) यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची १४ एकर शेती वार्षिक ७०,००० रुपये दराने तीन वर्षांसाठी ठेक्यानं घेतली आहे. त्यासाठी त्यांच्याकडे अधिकृत पोचपावती देखील आहे. पेरणीसाठी ते आपल्या मालकाच्या एमएच २९ बीपी ०५०५ या क्रमांकाच्या वाहनासह शेतात गेले होते. त्यावेळी गावातील पेंन्टना गोंटीमुकुलवार, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा करण शेतात येऊन त्यांनी येतील शेतीवर आपला दावा केला. तसेच, या शेतातील पेरणी थांबवण्याचा प्रयत्न केला. 'हे शेत आमचं आहे, तुम्ही येथे पेरणी करु नका' असंही त्यांनी म्हटलं. यावेळी, सचिन पंचरे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या ठेक्याची माहिती दिली. मात्र, वाद वाढत गेला आणि पेंन्टना यांनी हातातील कुऱ्हाडीने शेतात आलेले माजी आमदाराचे वाहन फोडले. दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पंचरे यांनी केली आहे. त्यानुसार, वाहनांची तोडफोड करणाऱ्याविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

वामनराव कासावार कोण आहेत?

वामनराव कासावार हे वणी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. सन २००९च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा जिंकत मुंबई गाठली होती. त्यानंतर, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत आपण निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे ते यवतमाळ जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT