Crime News : बाप की हैवान! ३२ वर्षीय दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या, बाभूळगावात खळबळ meta ai
क्राईम

Crime News : बाप की हैवान! ३२ वर्षीय दिव्यांग मुलाची निर्घृण हत्या, बाभूळगावात खळबळ

Crime News Yavatmal : यवतमाळमध्ये बापानेच आपल्या मुलावर कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली आहे. बापाने व्यसनासाठी पैसे मागितले. मुलाने नकार दिला. याच रागातून मुलाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृतकाच्या आईने बापाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Saam Tv

बापलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. व्यसनासाठी बापाने दिव्यांग मुलाकडे पैसे मागितले. मुलाने नकार दिला, म्हणून बापानेच आपल्या दिव्यांग मुलावर कुऱ्हाडीने वार करत खून केला.यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील सरूळ येथे बुधवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मृतकाच्या आईने आरोपी वडिलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

सरूळ गावात दिव्यांग असलेला मृत तरूण अरविंद मेश्राम (वय ३२ ) याला स्थानिक प्रशासनाच्या वतीने शासनाच्या घरकुल योजनेतून तसेच दिव्यांग निराधार योजनेतून स्वत:चा खर्च भागवण्यासाठी काही पैसे मिळत होते. अरविंद हा संपूर्ण शरीराने दिव्यांग होता. दैनंदिन गरजांसाठी सुद्धा त्याला घरच्यांवर अवलंबून राहावे लागायचे. त्यामुळे तो कायम घरातच असायचा. अरविंदचा आरोपी म्हणजेच त्याच्या वडिलांना व्यवसानाची सवय होती. अरविंद कडून याआधी अनेक वेळा घरच्या खर्चासाठी पैसे हवे असे सांगून तो पैसे घ्यायचा पण तेच पैसे व्यसनात उधळायचा. बुधवारी आरोपी भीमराव मेश्राम (वय ७१ ) याने पुन्हा अरविंदकडे व्यसनासाठी पैसे मागितले, पण यावेळी अरविंदने साफ नकार दिला.

नकार दिल्याच्या रागातून जवळच असलेल्या कुऱ्हाडीने अरविंदवर वार केले. यामुळे अरविंद रक्ताच्या थारोळ्यात पडला. आरोपी बापाने दिव्यांग मुलाच्या उजव्या डोळ्यावर, कानावर, गालावर जोरदार वार केले. या हल्ल्यात अरविंदचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. आरोपी बापाविरुद्ध आईने पोलिंस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी बापालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

शरीरात अचानक ही 10 लक्षणे दिसली तर समजा कोलेस्ट्रॉल वाढलय, वेळीच द्या लक्ष नाहीतर

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी 48 उमेदवार रिंगणात

Good News: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ, या राज्य सरकारचा मोठा निर्णय

Mumbai : थंडगार वारा अन् हिरव्यागार डोंगररांगा; ऑक्टोबरच्या उकाड्यात फिरा मुंबईजवळची 'ही' ७ भन्नाट ठिकाणं

डोळ्यांत राग, आक्रमक बाणा, राहुल-प्रियंका गांधी जमिनीवरच झोपले, पोलिसांनी उचलून बसमध्ये टाकलं, दिल्ली आंदोलनातील 6 PHOTO

SCROLL FOR NEXT