Yavatmal Nidhi Deshmukh  Saam Tv News
क्राईम

Yavatmal Crime : बनाना शेकमधून नवऱ्याला विष, मुख्याध्यापिका निधी देशमुखनं शिक्षक पतीचा काटा काढला, एका शर्टमुळे अडकली

Yavatmal Nidhi Deshmukh : रात्री शंतनू मद्यधुंद अवस्थेत घरी येताच निधीने त्याला बनाना शेकमध्ये विष मिसळून दिलं. ते पिताच शंतनू काही क्षणातच जागीच मृत्युमुखी पडला. त्यानंतर तिने ही बाब ट्युशनला येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना सांगितली.

Prashant Patil

यवतमाळ : यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमविवाह झालेल्या शिक्षिकेनेच तिच्या पतीला बनाना शेकमधून विष दिले. त्याचा जीव गेल्यानंतर ट्युशनला येणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेत महिलेने शहरालगतच्या चौसाळा येथील जंगलात त्याचा मृतदेह फेकला. शिवाय दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जाऊन पेट्रोल ओतून पेटवून दिले. ही बाब समोर येताच स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकाने आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

शंतनू अरविंद देशमुख (वय ३२) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर निधी शंतनू देशमुख (वय २४) असं आरोपी पत्नीचं नाव आहे. आरोपी निधीही सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका, तर शंतनू हा तिथे शिक्षक होता. वर्षभरापूर्वी त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर शंतनूला मात्र दारुचं व्यसन जडलं. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यास मोबाईलमधील अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो द्यायचा, तसेच मारहाणही करायचा, असं निधीनं सांगितलं. नेहमीच्या या त्रासाला निधी कंटाळली होती. त्यातूनच तिने शंतनूचा काटा कायमचा काढण्याचं ठरवलं.

रात्री शंतनू मद्यधुंद अवस्थेत घरी येताच निधीने त्याला बनाना शेकमध्ये विष मिसळून दिलं. ते पिताच शंतनू काही क्षणातच जागीच मृत्युमुखी पडला. त्यानंतर तिने ही बाब ट्युशनला येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच त्यांना भावनिक करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितलं. त्यानंतरही निधीला एक भीती सतावत होती, की त्याची ओळख पटली, तर आपण पोलिसांच्या हाती लागू. त्यातूनच तिने दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसह चौसाळा जंगल गाठून मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं.

१५ मे रोजी सकाळी चौसाळा परिसरात मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र मृताची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी गोपनीय माहिती गोळा केली. त्यामध्ये ज्या मित्रांबरोबर हत्येचा आदल्या दिवशी तो दारू प्यायला होता, त्यांच्याकडे त्या दिवशीचा त्याचा व्हिडीओ होता. शिवाय घटनास्थळावर त्याच्या शर्टच्या कापडाचे तुकडे आणि व्हिडिओतील शर्ट एकच असल्याने तो शंतनूच असल्याचं स्पष्ट झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

गरोदरपणात महिलांचं किती वजन वाढणं नॉर्मल?

Jalebi Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? मग झटपट घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी जलेबी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT