Rohit Pawar : 'भाजपने ओबीसींसाठी जबरदस्त खेळी...' भुजबळांच्या कमबॅकवर रोहित पवारांची खोचक टीका

Rohit Pawar on Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस २०१४ साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. राज्यात भाजपची सत्ता असताना छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं.
Rohit Pawar on Chhagan Bhujbal
Rohit Pawar on Chhagan BhujbalSaam TV News
Published On

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

सोलापूर : 'स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपने ओबीसींसाठी जबरदस्त खेळी केली आहे. छगन भुजबळांना विना पदाचं ठेवणं शोभत नव्हतं', असं म्हणत आमदार रोहित पवारांनी भाजप अन् भुजबळांना टोला लगावला आहे. छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया समोर येत आहेत. आमदार रोहित पवारांनी बुधवारी सोलापुरात असताना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी छगन भुजबळांना आणि भारतीय जनता पार्टीवर खोचक टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस २०१४ साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. राज्यात भाजपची सत्ता असताना छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आता छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री पदावर आहेत, कालच त्यांचा शपथविधी पार पडला. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व आमदार छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपमधील अनेक लोक नाराज आहेत. ज्यांनी भाजपला वाढवण्यासाठी आयुष्य घालवलं, भाजपमधील नेत्यांना भाजपनेच डावललं, त्यामुळे भाजपमधील नेते कार्यकर्ते पदाधिकारी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत, असंही आमदार रोहित पवारांनी बोलून दाखवलं.

Rohit Pawar on Chhagan Bhujbal
Nashik Crime : ड्रायव्हरनं बस थांबवलीच नाही, महिलेचं रुद्रावतार; लेकरासह ११ किमी पाठलाग, चालकाची गचांडी धरली; VIDEO

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे ओबीसींचे राजकीय नेतृत्व आहेत. त्यांनी २० मे रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते नवव्या वेळी मंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप झाल्याने मुंडेंनी मंत्रीपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एक मंत्रीपद रिक्त झाले होते. त्याजागी आता छगन भुजबळांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे मुंडेंना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळणं अवघड ठरण्याची शक्यता आहे.

Rohit Pawar on Chhagan Bhujbal
Jalgaon News : गाडी जरा बाजूला थांबवा; बाईकवरुन उतरली अन् २० वर्षीय विवाहितेनं नवऱ्यासमोर विहिरीत उडी घेतली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com