Yavtamal Crime News Saam tv
क्राईम

Crime News : लग्नानंतर बॉयफ्रेंडकडून छळ, तरुणीने नवऱ्याच्या मदतीने काढला काटा; दगड अन् चाकूने हल्ला करत संपवलं

Yavatmal Crime News : यवतमाळमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी पती-पत्नीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • यवतमाळमध्ये प्रेमप्रकरणातून हत्या

  • पती-पत्नी आरोपी अटकेत

  • २४ तासांत पोलिसांची कारवाई

  • तपास सुरू

संजय राठोड, यवतमाळ

Yavatmal Youth Aatish Deshmukh Murder News पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच यवतमाळमध्ये देखील एका तरुणाची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांमध्ये पोलिसांनी या हत्येचा शोध लावून दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या लाडखेड पोलीस हद्दीतील वाघापुर शेतशिवारात एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांत माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासात मृतक आतिश देशमुख याची हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचे समोर आले आहे.

आरोपी महिला व मृतक यांच्यातील संबंधांमुळे घरगुती वाद वाढत होते. सततचा त्रास, वाद आणि धमक्यांमुळे संतप्त झालेल्या पती-पत्नीने संगनमत करून आतिश देशमुख याची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली आहे.

घटनेच्या दिवशी आरोपींनी चाकू व दगडाच्या सहाय्याने त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला व मृतदेह शेतशिवारात टाकून दिला.पोलीसांनी वेगाने तपास करत आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना अटक केली.या जलद कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणास ३० जूनपर्यंत मुदतवाढ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Breaking News: कार आणि ट्रकचा भीषण अपघात; ३ वरिष्ठ पोलिसांसह चौघांचा जागीच मृत्यू, महामार्गावर रक्ताचा सडा

Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे स्थानकात ९ तासांचा मेगा ब्लॉक; दौंडकडे जाणाऱ्या अनेक ट्रेन रद्द

Friday Horoscope: या राशींची प्रेमामध्ये फसवणूकीची शक्यता आहे, वाचा तुमचं राशीभविष्य

Pune Traffic Update: सावधान! पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; जड वाहनांना नो एन्ट्री, जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT