Crime News 
क्राईम

Crime : जुन्या दोस्तीची शपथ, विवाहित मैत्रिणीला हॉटेलवर बोलावलं, टेरेसवर नेऊन ४ मित्रांचा सामूहिक बलात्कार

Crime News : मैत्रीची शपथ देत महिलेला चौघांनी भेटण्यासाठी बोलवले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Crime News : दोस्तीला काळं फासणारी घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. मैत्रीची शपथ देऊन महिलेला बोलवलं अन् तिच्यासोबत चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. कोरमंगला परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. एक आरोपी फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिला दिल्लीची आहे.

शुक्रवारी आरोपींनी जुन्या दोस्तीची शपथ देत महिलेला फसवले. त्यांनी तिला हॉटेलवर बोलवले. महिला हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर तिला छतवर गप्पा मारण्यासाठी म्हणून नेहण्यात आले. त्यानंतर चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. कोरमंगला पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. अजीत, विश्वास आणि शिवू असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहे. पोलिसांना तिन्ही आरोपींना पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमधून अटक केली. एकजण अद्याप फरार आहे. आरोपी एचएसआर लेईऊटमध्ये एका हॉटेलमध्ये काम करत होते.

फरार चौथ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पीडित महिलेची मेडिकल तपासणी करण्यात आली आहे. सारा फातिमा म्हणाल्या की, पीडित महिला मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती, हे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. पीडित महिला दिल्लीतील प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. सध्या त्या बंगळुरूमध्ये राहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT