Kurla Crime News Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: खळबळजनक! कुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, गळा आवळून हत्या केल्याचा संशय

Kurla Crime News: कुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, गळा आवळून हत्या केल्याचा संशय

Satish Kengar

Woman body was found in suitcase at Kurla West Shanti Nagar:

एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला येथे रविवारी सकाळी सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. तिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11.30 च्या सुमारास एका पादचाऱ्याला सीएसटी रोडजवळील पुलाखाली एक सोडून दिलेलं सुटकेस दिसलं होतं. या सुटकेस बाबत संशय आल्याने त्या व्यक्तीने याची माहिती पोलिसांना दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या सुटकेसची तपासणी केली, ज्यात त्यांना महिलेचा मृतदेह सापडला. या मृत महिलेचे वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने टीशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परिधान केली होती, म्हणजे प्रथमदर्शनी, लैंगिक अत्याचाराची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. तसेच शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सुटकेस सापडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यात त्यांना अद्याप यश आलेलं नाही. कुर्ला पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचाही तपासात सहभाग आहे.

मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी अधिकारी सर्व पोलिस ठाण्यातून बेपत्ता महिलांची माहिती गोळा करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT