Washim Crime News Saam tv
क्राईम

Washim Crime News : देशी बनावटीच्या पिस्तुलसह युवकास अटक

गोपनीय बातमीदारामार्फत मोहगव्हाण येथील एक जण देशी बनावटीचे अग्निशस्त्र विनापरवाना बाळगून असल्याची माहिती एलसीबीच्या पाेलिसांना प्राप्त झाली हाेती.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News :

विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (washim local crime branch) वाशिमच्या मोहगव्हाण येथील एका २९ वर्षीय युवकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. नितीन बबन दंदे असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

गोपनीय बातमीदारामार्फत मोहगव्हाण येथील एक जण देशी बनावटीचे अग्निशस्त्र विनापरवाना बाळगून असल्याची माहिती एलसीबीच्या पाेलिसांना प्राप्त झाली. त्यानुषंगाने त्या ठिकाणी जाऊन संशयितास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली.

युवकाच्या कमरेला एक सिल्व्हर रंगाची देशी बनावटीची पिस्तूल मॅगझीनसह (अंदाजे किंमत १५ हजार रुपये) मिळून आली. पाेलिसांनी नितीन बबन दंदे (वय २९ रा. मोहगव्हाण, ता.जि.वाशिम) यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री,कोल्हापूर गॅझेटीयरमध्ये नेमकं काय?

Jalgaon Stone Pelting: जळगावमध्ये ईद मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

SCROLL FOR NEXT