Wardha Crime Saamtv
क्राईम

Wardha Crime: मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक; कारसह लाखोंची रक्कम जप्त

Wardha Latest News: दत्तराज संतराज डोमेग्रामकर यांनी २१ डिसेंबर २०२३ मध्ये खरांगणा पोलीस ठाणे गाठून श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने ४० हजारांची रक्कम चोरून नेल्याची तक्रार दिली होती.

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता. ४ फेब्रुवारी २०२४

Wardha Crime:

वर्धा जिल्ह्याच्या तळेगाव येथील श्रीकृष्ण मंदिरात चोरी करून ४० हजार रुपयांची रक्कम चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्यास सायबर सेल व सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक तपास करून जेरबंद केले. रोशन उर्फ बबन रमेश वरघट (रा. मरामाय नगर, काटोल, जि. नागपूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून महागड्या कारसह १,९६५ रुपये रोख आणि मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.

दत्तराज संतराज डोमेग्रामकर यांनी २१ डिसेंबर २०२३ मध्ये खरांगणा पोलीस ठाणे गाठून श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने ४० हजारांची रक्कम चोरून नेल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी खरांगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याचा समांतर तपास सायबर पोलिस ठाणे आणि सायबर सेलकडून सुरू असतानाच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी रोशन उर्फ बबन रमेश वरघट याचा शोध घेत ताब्यात घेण्यात आले.

त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने त्याच्या चार मित्रांबरोबर मिळून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १,९६५ रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाइल, एम. एच. ०४, जीडी. ४३१६ क्रमांकाची कार जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या निर्देशात वैभव कट्टोजवार, दिनेश बोथकर, नीलेश तेलरांधे, नीलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळी यांनी ही कारवाई केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, आरोपी बबन रमेश वरघट याला पोलिसांनी बेड्या घातल्या असता आरोपीने मंदिरातील चोरी त्याच्या चार साथीदारांसह केल्याची कबुली दिली. तीन चोरटे नागपूर येथील घरफोडी प्रकरणांत कारागृहात आहेत तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. सायबर पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT