Wardha Crime Saam Tv
क्राईम

Wardha Crime News: युट्यूबवर व्हिडिओ पाहून चोरी करणं शिकला; पण एका चुकीने अडकला अन् जेरबंद झाला

Learned On YouTube To Theft Bike: सध्या आपल्याला 'यू-ट्यूब'वर सर्वकाही शिकायला मिळतंय. अगदी चोरीसुध्दा आपण ‘यू-ट्यूब’वर शिकू शकतो. अशी घटना वर्ध्यामध्ये घडली आहे.

Rohini Gudaghe

चेतन व्यास

Wardha Crime Bike Theft Arrested

दिवसेंदिवस गुन्हेगारी, चोरीचं प्रमाण वाढत आहे. चोरी करण्याचे वेगवेगळे प्रकार देखील समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी चड्डी गॅंगसमोर आली होती. आता वर्ध्यात (Wardha) देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. ‘यू-ट्यूब’वर शिकून चोरी करण्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. (Latest Crime News)

‘यू-ट्यूब’वर (YouTube) दुचाकी चोरीचे व्हिडीओ पाहून ठिकठिकाणी दुचाकी चोरी (Learned on YouTube to theft bike) करणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील चार दुचाकी असा ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रितिक श्रीराम वाघाळे (२२, रा. धामणगाव हिंगणी), प्रणिकेत केशव नागोसे (१९, रा. हिंगणी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यू-ट्यूबवर व्हिडीओ बघून चोरी केली

नालवाडी परिसरात एक तरुण मोटारसायकल विकण्यासाठी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली (Wardha Crime) होती. त्याच्यावर संशय असल्याने पोलिसांनी तात्काळ त्या तरूणाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने दुचाकी सावंगी हद्दीतील येळाकेळी येथून चोरल्याची कबुली दिली. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने यू-ट्यूबवर व्हिडीओ बघून वेगवेगळ्या ठिकाणावरून गाड्या चोरल्याचं (Bike Theft) पोलिसांना सांगितलं आहे.

दोन्ही चोरट्यांनी सेलू, हिंगणी व हिंगणा- नागपूर शिवारातून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या दुचाकींची माहिती दिली. चोरट्यांनी ज्या ठिकाणी दुचाकी लपविल्या होत्या, त्या ठिकाणी जात पोलिसांनी दुचाकी हस्तगत केल्या. दोन्ही आरोपींना सावंगी पोलीस ठाण्याकडे सुपुर्द करण्यात आलं. चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलीस पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, (Crime News) नरेंद्र पाराशर, अमरदीप पाटील, रामकिसन इप्पर, नितीन इटकरे, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, गणेश खेवले यांनी केली आहे.

सध्या आपल्याला 'यू-ट्यूब'वर सर्वकाही शिकायला मिळतंय. अगदी चोरीसुध्दा आपण ‘यू-ट्यूब’वर शिकू शकतो. अशी घटना वर्ध्यामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली (Wardha Crime News) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT