Wardha Latest News: Saamtv
क्राईम

Wardha Crime: वडिलांच्या हत्येचा राग, दोघे भाऊ आरोपीला संपवायला निघाले, पोलिसांना माहिती मिळाली अन्... वर्ध्यात खळबळ

Wardha Latest News: वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन सावत्र मुले हत्येत सहभागी असलेल्या तसेच जामिनावर सुटलेल्या आरोपीचा शोध घेत त्याची हत्या करण्याच्या प्रयत्नात होते

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता. ३१ ऑगस्ट २०२४

वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांच्या खूनप्रकरणातील एकाला संपवण्याच्या तयारीत असलेल्या दोन भावांना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टलसह चाकू व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा हत्येचा कट उधळला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्ध्यामधील इतवारा परिसरातील रहिवासी जावेद पठाण याची वर्षभरापूर्वी हत्या करण्यात आली होती. जावेद पठाण यांच्या हत्येने दुखावलेले त्यांची दोन सावत्र मुले सूरज विक्रमसिंग चौधरी (वय २३), नीरज विक्रमसिंग चौधरी (१९) यांनी आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्यांचा बदला घ्यायचा प्लॅन करत होते. अशातच वडिलांच्या हत्या प्रकरणातील आरोपी रेहान शेख हा कारागृहातून जामिनावर सुटल्याची माहिती सूरज व नीरज यांना मिळाली त्यानंतर त्यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला.

वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन सावत्र मुले हत्येत सहभागी असलेल्या तसेच जामिनावर सुटलेल्या आरोपीचा शोध घेत त्याची हत्या करण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती वर्धा शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई करत बोरगाव परिसरातील एका चहाच्या टपरीवरून दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) तसेच दोन चाकू व एक दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खेड तालुक्यातील निघोजे येथे पत्नीच्या अंगावर चिठ्ठी फेकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून निघोजे येथील 25 वर्षीय संकेत रामचंद्र गावडे या विवाहित तरुणाला त्याच्या पत्नी व मुलासमोर बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली होती. या घटनेत जखमी व्यक्तीचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या प्रकरणात महाळुंगे पोलिसांनी सात आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून, त्यातील पाच आरोपींना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT