Wardha Boyfriend stabs girlfriend with knife Saam Tv News
क्राईम

Wardha Crime : सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका, ऐनवेळी गर्लफ्रेंडचा लग्नास नकार; बॉयफ्रेंडचा तरुणीवर चाकूहल्ला

Wardha Crime : जखमी तरुणी ही विठ्ठल-रुख्मिणी मंदिर मार्गावरील डॉ. भाईमारे यांच्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी सर्व कर्मचारी दैनंदिन काम करत होते. एक तरुण पीडितेला भेटण्यासाठी आला.

Prashant Patil

चेतन व्यास, साम टिव्ही

वर्धा : दोन वर्षापासून सुरू असलेल्या प्रेम संबंधात तरुणीने लग्नास नकार दिला. तरुणीने नकार देतात संतापलेल्या प्रियकराने तरुणी काम करत असलेल्या रुग्णालय परिसरात जात तिच्यावर कटरने प्राणघात हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रकरणी वर्धा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. सौरभ रवींद्र क्षीरसागर (वय २८, रा. भूगाव) असं आरोपीचं नाव आहे. ही घटना स्पर्धेच्या विठ्ठल मंदिर मार्ग परिसरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयाजवळ घडली. ज्या वेळी ही घटना घडली त्याच वेळी परिसरात उभा असलेल्या एका तरुणाने मारेक-याच्या तावडीतून संबंधित नर्सला वाचविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

जखमी तरुणी ही विठ्ठल-रुख्मिणी मंदिर मार्गावरील डॉ. भाईमारे यांच्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी सर्व कर्मचारी दैनंदिन काम करत होते. एक तरुण पीडितेला भेटण्यासाठी आला. पीडिता आणि संबंधित तरुण हॉस्पिटलसमोर बोलत असतानाच अचानक या तरुणाने धारदार शस्त्राने तरुणीवर हल्ला चढविला. यात तरुणी जखमी झाली. तरुणीवर थेट धारदार शस्त्राने वार केले जात असल्याचे याच परिसरात उभ्या असलेल्या एका तरुणाच्या निदर्शनास येताच त्याने तरुणीला वाचविण्यासाठी धाव घेतली. दरम्यान पीडित तरुणीनेही स्वत:ला वाचविण्यासाठी माकपच्या जिल्हा कार्यालयात आसरा घेतला. परिसरात नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच आरोपी माथेफिरू तरुणाने घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी तरुणीला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यावर तिला सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास चक्र फिरवले व काही वेळेतच आरोपीला ताब्यात घेतले. सावंगी रुग्णालयात पोलिसांकडून तरुणीचा जबाब नोंदविला जात आहे जबाबानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय मात्र ज्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. माथेफिरु प्रियकराने तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला चढवित तिला जखमी केल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

Rajya Sabha : विनोद तावडे खासदार होणार? भाजपकडून ५ नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT