क्राईम

Wardha Crime: अनोळखी व्यक्तीकडे दारूसाठी मागितले पैसे, नकार दिल्याने युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; घटना कॅमेऱ्यात कैद

Wardha Crime: दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून एका मद्यपीने युवकाची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना वर्ध्यातील देवळीच्या पोलीस वसाहतीसमोर घडलीय. या हत्येचा थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केलीय.

Bharat Jadhav

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीवरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ब्रेकअप झालं म्हणून भरदिवसा तरुणीची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच वर्ध्यातही घटना घडलीय. हत्याचा थरार हा मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा दृश्य अंगावर शहारे आणणारे आहेत.

दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका मद्यपीने दारुच्या नशेत युवकाची दगडाने ठेचून हत्या केली. मृत झालेल्या व्यक्तीचं नाव विनोद डोमाजी भरणे असून तो देवळी तालुक्याच्या सोनेगाव आबाजी येथील रहिवाशी होता. तर आरोपीचं नाव कैलाश मोहिते असं आरोपीचं नाव आहे. आरोपी हा देवळीच्या तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीचा रहिवासी आहे, पोलिसांनी त्याला ताब्यात घटनास्थळावरुन ताब्यात घेतलं आहे. विनोदची हत्या करताना आरोपी कैलास हा दारुच्या नशेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद आबाजी भरणे हा देवळी येथून आपलं काम आटपून गावाला जात होता. पोलीस वसाहतीसमोर तो ऑटोची वाट पाहत उभा होता. त्यावेळी मद्यपी आरोपीने विनोदकडे पैसे मागितले. विनोद आणि आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते. तरीही आरोपी त्याच्याकडे पैसे मागत होता. विनोदने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने आरोपीने विनोदवर दगडाने हल्ला केला. रस्त्यावर निपचीत पडलेल्या विनोदवर आरोपीने दगडाने हल्ला करत होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या हत्येचा थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती मिळालीय. ही घटना घडत असताना तेथे प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका महिलेने या घटनेची सर्व हकीकत सांगितली. मृतक ज्या गावतील होता, त्या गावातील असलेली महिला मीरा शालिक मुन हिच्यासोबत विनोद जात होता त्यावेळी आरोपी आणि त्याच्यात वाद झाला. आरोपीने विनोदला थांबवलं आणि दारूसाठी पैसे, पैसे मागितले. पैसे न दिल्याने आरोपीने त्याला मारहाण केली. विशेष म्हणजे ही घटना पोलीस वसाहतीसमोर घडली. तरीही मारहाण होताना कोणीच विनोदाच्या बचावासाठी पुढे आले नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी आरोपीला अटक केली. या गुन्हाचा पुढील तपास पुलगाव उपविभागीय अधिकारी राहुल चौहान, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT