Wardha Crime News Saam TV
क्राईम

Wardha Crime News: लाच स्वीकारताना ग्रामसेवक महिलेला पकडलं रंगेहात; वर्धामधील संतापजनक घटना

Crime News: मंजूर विहिरीच्या उर्वरित रकमेचा धनादेश देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना बोदड येथे ग्रामसेवक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केलीये.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Wardha:

राज्यात सरकारी कार्यालयांमध्ये लाच घेण्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. वर्धामध्ये देखील लाच घेताना एका महिलेला रंगे हात पकडण्यात आलं आहे. मंजूर विहिरीच्या उर्वरित रकमेचा धनादेश देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना बोदड येथे ग्रामसेवक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केलीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना (वय ४३) असं आरोपी ग्रामसेवीका महिलेचं नाव आहे. देवळी तालुक्यातील बोदड येथील एका शेतकऱ्यास मनरेगाअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झालीये. विहिरीकरिता मंजूर उर्वरित रकमेचा धनादेश देण्यासाठी ग्रामसेविका अर्चना किसनराव बागडे यांनी तक्रारदार शेतकऱ्यास दोन हजार रुपयांची मागणी केली.

त्या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी दोन हजारांची लाच दिली. लाच स्वीकारताना महिलेला रंगेहात अटक करण्यात आलीये. याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अभय अष्टेकर, पोलिस निरीक्षक सुहासिनी सहस्रबुद्धे, संतोष बावनकुळे, स्मिता भगत, कैलास वालदे, राखी फुलमाळी, पंकज डहाके, प्रशांत मानमोडे, प्रदीप कुचनकर, नीलेश महाजन आदींनी केली. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT