उत्तर प्रदेशमध्ये लग्नात बिर्याणी आणि तळलेले मासे न ठेवल्याने वाद निर्माण झाला.
वरपक्षाने मुलीकडच्या नातेवाईकांवर हल्ला केला.
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे लग्न मोडता मोडता वाचलं.
घटनेनंतर नवऱ्याने नवरीला घरी येण्यास मनाई केली आहे.
उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये लग्न समारंभात जेवणात बिर्याणी आणि तळलेले मासे न ठेवल्याने तुंबड हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर जवळ जवळ लग्न मोडता मोडता सावरलं आहे. या प्रकरणी भर मंडपात मुलीकडच्यांना हाणामारी थांबवायला पोलिसांना बोलवण्यात आले. दरम्यान या घटनेने लग्नाला आलेल्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळलेल्या माहितीनुसार, लग्नात मुलीकडून मुलाच्या घरच्यांनी स्कॉर्पियो गाडीची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यात आली. याचं मागणीसोबत मुलाकडच्या नातेवाईकांनी लग्नाच्या मेजवानीत बिर्याणी आणि तळलेले मासे ठेवण्याचा आग्रह केला होता. साखरपुडा संपल्यानंतर लग्न उरकलं आणि दोन्ही बाजूने लग्नाला आलेल्या नातेवाईकांनी जेवणाला सुरुवात केली.
मुलाकडच्या वऱ्हाडी मंडळींना जेवताना मेजवानीत बिर्याणी आणि मासे न दिसल्याने त्यांनी हंगामा केला. मुलीकडच्या नातेवाईकांना मारहाण केली. ही मारामारी थांबवण्यासाठी मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तडक लग्नमंडपात डॅशिंग एन्ट्री घेत या वादात मध्यस्थी केली. तरीही या दोन्ही कुटुंबातले वाद थांबता थांबत नव्हते.
पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी हा वाद थांबला. मात्र लग्नाची वरात निघाल्यानंतर नवऱ्या मुलाने नवरी मुलीला घरी येण्यास बंदी घातली. या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांनी वर पक्षावर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून पुढील कारवाई केली जाईल असे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान बिर्याणी आणि तळलेले मासे जेवणात न ठेवल्याने झालेला हा वाद चर्चेचा विषय ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.