Honeymoon Couple Missing Saam Tv News
क्राईम

Crime News : जंगलात हनिमूनसाठी गेले, नव्या जोडप्यासोबत घडलं भयंकर; राजा-सोनमनंतर नवीन प्रकरण समोर

Honeymoon Couple Missing : उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. एक नवविवाहित कपल हनिमूनला सिक्किम येथे गेलं होतं. पण त्यांच्या या जीवनप्रवासात दु:खद घटनेचं वळण लागलं.

Prashant Patil

प्रतापगढ : उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. एक नवविवाहित कपल हनिमूनला सिक्किम येथे गेलं होतं. पण त्यांच्या या जीवनप्रवासात दु:खद घटनेचं वळण लागलं. रहाटीकर गावातील रहिवासी कौशलेंद्र सिंह आणि त्याची पत्नी अंकिता सिंह २४ मे रोजी सिक्किमला गेले होते. २९ मे रोजी संध्याकाळी त्यांची ट्रॅव्हलर व्हॅन मगन जिल्ह्यात १००० फूट खोल दरीत कोसळली.

वाहनासोबतच ते नदीत वाहून गेले, पण अजूनही त्यांचा पत्ता लागला नाहीय. दरम्यान, या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दर दोनजण जखमी झाले आहेत. तसच कौशलेंद्र आणि अंकितासह ८ प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेनंतर एनडीआरफच्या टीमकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत असल्याचं समजत आहे.

कौशलेंद्र आणि अंकिताचं लग्न ५ मे रोजी झालं होतं. या घटनेमुळं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. कौशलेंद्रचे वडील शेर बहादूर सिंह त्यांच्या कुटुंबियांसोबत सिक्किमला पोहोचले आहेत. स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून दोघांचाही शोध घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

सिक्किमच्या हॉटेलमधून या कपलचं सामान ताब्यात घेण्यात आलं आहे. कुटुंबियांनी उत्तर प्रदेश आणि सिक्किम सरकारला आवाहन केलं आहे की, सर्च ऑपरेशन वेगानं सुरु करावं. जेणेकरून एखादा पुरावा सापडेल. घटना घडल्यानंतर जवळपास ८ दिवसानंतरही कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीय. कौशलेंद्र आणि अंकिता कुठे आहेत? हा सवाल आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT