UP Crime News Saam Digital
क्राईम

UP Crime News: चक्क डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण, तीन डॉक्टर निलंबित

UP Crime News: उत्तर प्रदेशच्या मेरठ मेडीकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. मेडीकल कॉलेजच्या ज्युनियर डॉक्टरांनी ही मारहाण केली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

UP Crime News

उत्तर प्रदेशच्या मेरठ मेडीकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. मेडीकल कॉलेजच्या ज्युनियर डॉक्टरांनी ही मारहाण केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओत डॉक्टरांचे रुग्णांसोबत कशा प्रकारच वर्तन करतायेत हे स्पष्ट दिसत आहे. धक्कादायक म्हणजे ही मारहाण सुरू असताना एक लहान मुलगी ओरडून ओरडून आपल्या नातेवाईकांना वाचवण्याची विनंती करताना दिसत आहे.एका पाच वर्षांच्या मुलावर उपचार करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

परिक्षीतगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या या मुलाच्या हाताला दुखापत झाली होती. त्यावर उपचार करण्यासाठी मुलाची आई आणि त्याचे काही नातेवाईक रुग्णालयात आले होते. यावेळी कोणत्यातरी कारणावरून डॉक्टर आणि त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हुज्जत घालणाऱ्या डॉक्टरांनी इतर डॉक्टरांना बोलावून घेतले आणि त्यांना जबर मारहाण करायला सुरुवात केली. इतकच नाही तर महिलांचे केस पकडून मारहाण करण्यात आली. त्यांचे मोबाईल हिसकावून घेऊन जमिनीवर आपटले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा सर्व प्रकार सुरू असताना तिथे उपस्थित कोणीतरी याचे चित्रिकरण करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान मेरठ मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. सी. गुप्ता यांनी मारहाण केलेल्या डॉक्टरांना तात्काळ निलंबित केले असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन जणांची समिती स्थापन केली आहे.

मेरठ मेडीकल कॉलेजमधील मारहाणीचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही इथल्या डॉक्टरांकडून अनेकवेळा रुग्णांना मारहाण झाली आहे. दरम्यान या व्हिडीओची पोलिसांनी पण दखल घेतली असून मारहाण करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून इथल्या डॉक्टरांनी ६० वर्षांची महिला आणि एका गरोदर महिलेलाही मारहाण केली असून या घटनेची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish- Genelia Deshmukh: रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट कुठे झाली?

Home Remedies : कपड्यांना साबणाचा वास येतोय? झटपट करा ५ घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: अकोला राडा प्रकरण : पोलिसांकडून ६ जणांना अटक

Shah Rukh Khan injured: शाहरुख खान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गंभीर जखमी; सिनेमाच्या सेटवर नेमकं काय घडलं?

Politics: हनी ट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं, बड्या नेत्यांचा समावेश; काँग्रेसच्या नेत्यानं उघडले पत्ते

SCROLL FOR NEXT