Uttar Pradesh Crime Saam tv
क्राईम

Crime: पहिल्या बायकोसोबत जास्त वेळ घालवायचा, दुसरीचा संताप अनावर; नवऱ्याचा झोपेतच घेतला जीव

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये बायकोने नवऱ्याची गळा दाबून हत्या केली. नवरा त्याच्या पहिल्या बायकोला जास्त वेळ देतो त्यामुळे संतप्त होत महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये भयंकर घटना घडली. एका महिलेने आपल्या नवऱ्याची गळा दाबून हत्या केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. या महिलेची चौकशी केली असता धक्कादायक कारण समोर आलं. तिचा नवरा पहिल्या बायकोसोबत जास्त वेळ घालवायचा. तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता. त्यामुळे महिला संतप्त झाली होती. याच रागात तिने नवऱ्याला संपवलं. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुजफ्फरनगरच्या टांडा मजरा गावामध्ये घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या ४० वर्षीय संजय कुमारने दोन लग्न केली होती. संजयची पहिली बायको दुसऱ्या गावामध्ये राहत होती. तर दुसरी बायको कविता (३० वर्षे) त्याच्यासोबत राहत होती. संजयने २००० मध्ये कवितासोबत लग्न केले होते. कविताने २९ ऑगस्टच्या रात्री नवऱ्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी कविताला ताब्यात घेतलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संजयचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. महिलेने तिचा गुन्हा कबुल केला. महिलेविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी कविताची चौकशी केली असता तिने नवऱ्याच्या हत्येची कबुली दिली. तिने पोलिसांना सांगितले की, 'माझा नवरा सतत त्याच्या पहिल्या बायकोलाला महत्व देत होता. माझ्याकडे तो अजिबात लक्ष देत नव्हता. माझा नवरा माझ्याकडे दुर्लक्ष करायचा. तो पहिल्या बायकोला जास्त वेळ द्यायचा. याचाच राग आल्यामुळे त्याची हत्या केली.' या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; १९२ पदांसाठी भरती;अर्ज कुठे अन् कसा करावा?

MG M9 luxury car: गणेशोत्सवात हेमा मालिनींनी खरेदी केली ही नवी कार, जाणून घ्या स्पेशल फिचर्स आणि किंमत

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Solapur : १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा; सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील धक्कादायक घटना

Zing Marathi Movie : "तमाशा म्हणजे काय?"; 'झिंग' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT