Uttar Pradesh News Saam TV
क्राईम

Uttar Pradesh News: क्रूर सासू! ८ महिन्यांच्या गरोदर सुनेवर हल्ला; डोक्यात वरवंटा घालून हत्या

Uttar Pradesh Crime: लग्नाला दीड वर्षांचा काळ लोटल्यावर स्वाती गरोदर राहिली होती.

Ruchika Jadhav

Uttar Pradesh:

उत्तर प्रदेशमध्ये एक महिला कौटुंबीक हिंसाचाराची बळी ठरली आहे. सासूने क्रूरतेने आपल्याच सुनेची हत्या केलीये. स्वाती (वय 32) असं मृत सुनेचं नाव आहे. लग्नाला दीड वर्षांचा काळ लोटल्यावर स्वाती गरोदर राहिली होती. ८ महिन्यांचं बाळ तिच्या पोटात असूनही सासूने तिच्या डोक्यात वरवंटा घातला आणि या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सहारनपुरमधील बडगावशेजारी असलेल्या जडौंदा पाडा गावामध्ये ही घटना घडली आहे. गर्भवती सुनेची हत्या केल्यानं पोलिसांनी सासूला ताब्यात घेतलं आहे. दीड वर्षांपूर्वी स्वातीचं हरिओमसोबत लग्न झालं होतं.

रेखा असं आरोपी सासूचं नाव आहे. बुधवारी या दोन्ही सासू सुनेमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. भांडण झाल्याने रागाच्याभरात सासूने टोकाचं पाउल उचललं. तिने घरात असलेला दगडी वरवंटा सुनेच्या डोक्यावर मारला. या हल्ल्यात स्वाती जागीच खाली कोसळली. खाली पडल्यावर तिच्या पतीने तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मेरठला घेउन जाण्याचा सल्ला दिला. गुरुवारी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली. मुलीच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी टाहो फोडला. तसेच मुलीची सासू जादुटोना करणारी व्यक्ती असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. सासूने नारहाण केल्यामुळेच आमच्या मुलीचा मृत्यू झालाय, असं सुनेच्या नातेवाईकांनी म्हटलंय.

ही घटना घडली त्यावेळी स्वातीच्या आई बाबांना ती माळ्यावर चढताना शिडीवरून पडल्याचं सांगितलं गेलं. मात्र हे खोटं असून आमच्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलाय. उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अन्यायाच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. त्यातच आता ८ महिन्यांच्या गरोगर आईची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ खडसेंकडून आसिम सरोदेंची भेट

Congress : काँग्रेसला मोठा धक्का! सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिग्गज नेत्याच्या पॅनलचा दारुण पराभव, महायुतीचा विजय

खडसेंच्या जावयाला ठरवून ट्रॅपमध्ये अडकवलंय, कॉल करून बोलावलं अन्.. हॅकरचा मोठा दावा

Kriti Sanon Saree Look: सणासुदीला नेसा क्रिती सॅननसारख्या 'या' ग्लॅमरस साड्या

Bathroom Vastu Tips: बाथरूममध्ये मीठ का ठेवावे? या मागील कारण काय?

SCROLL FOR NEXT