Uttar Pradesh Crime News Saam tv
क्राईम

Crime News: बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलताना पाहिलं, संतापलेल्या आईने पोटच्या मुलीला संपवलं

Uttar Pradesh Police: १५ वर्षांची मुलगी मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती. मुलीला पाहून संतप्त झालेल्या आईने तिची गळा आवळून हत्या केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये आईनेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली. बागपतमधील बरौत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिजरोल गावामध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

१५ वर्षीय मुलगी बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती. तेव्हा या मुलीच्या आईने तिला पाहिले. त्यामुळे संतापलेल्या आईने मुलीची गळा दाबून हत्या केली. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आईने आपल्या मुलीला बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलताना पाहिले. त्यानंतर तिने तिची हत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला बॉयफ्रेंडशी बोलताना पाहून संतापलेल्या आईने तिचा गळा आवळून खून करण्यचा प्रयत्न केला. मुलगी बेडवर पडली. महिलेला वाटलं ती अशीच पडली आहे. ती जिवंत असल्याचे समजून आरोपी महिला घरकाम करू लागली. चार तासानंतर ती आपल्या मुलीला उठवण्यासाठी आली तेव्हा तिला तिचा मृत्यू झाल्याचे समजले.

आरोपी महिलेचा पती खेळण्याचा व्यापारी आहे. घटनेच्या वेळी तो सुलतानपूरमध्ये होता. आरोपी महिला आपल्या ९ मुलांसह गावामध्ये राहत होती. आर्थिक अडचणींमुळे महिलेच्या मुलीने शाळा सोडली होती आणि ती घरीच आईला मदत करत होती.

मुलीच्या हत्येनंतर आरोपी महिलेने तिचा मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी तिला पाहिले. त्यानंतर गावकऱ्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला अटक केली. महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या तपास करत आहे. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

SCROLL FOR NEXT