Uttar Pradesh Saam TV
क्राईम

Uttar Pradesh: आई मला माफ कर...! कर्जाचा डोंगर डोईजड झाला; तरुणाने व्हिडीओ कॉल करून संपवलं जीवन

Firozabad: हा व्हिडीओ त्याने आपल्या भावाला पाठवला आणि नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Ruchika Jadhav

Uttar Pradesh Crime News:

कर्ज फेडू न शकल्याने एका व्यक्तीने स्वत:चं जीवन संपवलं आहे. नदीत उडी घेऊन त्याने आपलं आयुष्य संपवलंय. या व्यक्तीने आत्महत्या करण्याआधी आपला एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ त्याने आपल्या भावाला पाठवला आणि नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. (Latest Marathi News)c

प्रशांत अग्रवाल (वय ३०) असं मृत तरुणाचं नाव आहे. या तरुणाच्या डोक्यावर १० लाखांचं कर्ज होतं. कर्ज घेतल्यानंतर ते फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. ज्या व्यक्तीकडून कर्ज घेतले होते त्यांच्याकडून सातत्याने पैशांची मागणी करण्यात येत होती. मात्र एवढी मोठी रक्कम फेडणे अवाक्याबाहेरचे असल्याचे लक्षात आल्यावर प्रशांतने टोकाचं पाऊल उचललं. त्याने काढलेल्या व्हिडीओतून पोलिसांनी अशी माहिती दिलीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तरुणाने अत्महत्येचा निर्णय घेतला तेव्हा आधी त्याने आपल्या भावाला व्हिडीओ कॉल केला होता. भावाने व्हिडीओ कॉल न उचलल्याने त्याने स्वत:च आपल्या कॅमेऱ्यात व्हिडीओ रेकॉर्ड करून भावाला पाठवला. व्हिडीओ पाहिल्यावर आपला भाऊ आत्महत्या करत असल्याचे समजताच लहान भावाच्या पायाखालची जमीनच सरकली.

व्हिडीओमध्ये प्रशांत रडत रडत म्हणत होता, आई, शिवानी मला माफ करा. माझ्यावर खूप कर्ज आहे. मी जे बारक्यासाठी कर्ज घेतलं होतं ते परत फेडू शकत नाही. त्यामुळे मी असं पाऊल उचलत आहे, असं त्याने व्हिडीओत म्हटलं.

भावाला हा व्हिडीओ मिळाल्यावर त्याने तातडीने पोलिसांना याबाब माहिती दिली. पोलिसांनी नदी पात्राजवळ धाव घेऊन पाण्यात तपास केला. यावेळी पाण्यात प्रशांतचा मृतदेह सापडला. यमुना नदीकाठी पोलिसांना प्रशांतचा मोबाईल आणि दुचाकी सापडलीये. पोलिसांनी हे सर्वकाही ताब्यात घेतलंय.

व्हिडीओमध्ये प्रशांतने आरोपी व्यक्तींची नावे देखील सांगितली आहेत. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Poha Ladoo Recipe : वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा लाडू, संध्याकाळची भूक जाईल पळून

'Bigg Boss 19'च्या स्पर्धकावर हिना खान भडकली, फरहाना भट्ट नेमकं काय म्हणाली?

Sangli Accident : कारने बाईकला चिरडलं, आजी-आजोबा अन् नातवाचा जागीच मृत्यू, सांगलीत भयानक अपघात

Pollution Free Pune : पुणेकरांनो मोकळा श्वास घ्या, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली, देशात दहावा क्रमांक

SCROLL FOR NEXT