Uttar Pradesh Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : ४ तरुण अन् ४ तरुणी एकाच खोलीत नको त्या अवस्थेत; पोलिसांनी धाड टाकताच धक्कादायक प्रकार उघड

Uttar Pradesh Crime News : उत्तरप्रदेशात भाड्याच्या घरात चालणाऱ्या अनैतिक कृत्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

  • एकाच घरात ४ तरुण आणि ४ तरुणींना नको त्या अवस्थेत पोलिसांनी पकडलं

  • एसीपी किडगंज यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

  • सेक्स रॅकेटचा संशय

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील किडगंज पोलीस स्टेशन परिसरात घाणेरड्या कृत्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोरा स्मशानभूमीजवळील एका गल्लीत असलेल्या भाड्याच्या घरात अश्लील कृत्ये होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी गुप्तपणे तपास सुरू केला आणि त्यानंतर छापा टाकत चौघांना अटक केली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवाशांना बऱ्याच काळापासून संशय होता आणि पोलिसांना देखीलसतत तक्रारी येत होत्या की, सदर घरात काहीतरी अनुचित घडत आहे. या तक्रारी आणि माहिती देणाऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. एसीपी किडगंज राजीव यादव यांच्या सूचनेनुसार, स्टेशन प्रभारी वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी या संशयित घरात छापा टाकताच त्यांना घरामध्ये ४ तरुण आणि ४ तरुणी रंगेहाथ नको त्या अवस्थेत पकडले गेले. घटनास्थळी सापडलेला तरुण आणि महिला प्रयागराज येथील रहिवासी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे लोक घरात किती काळ राहत होते, घर कोणाच्या नावाने भाड्याने घेतले होते आणि या घटनेमागे काही रॅकेट कार्यरत होते का याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिस सर्व गोष्टींचा सखोल तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी किडगंज परिसरात भाड्याच्या घरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. एसीपी किडगंज यांनी सांगितले की, या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू आहे. चौकशी आणि तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. अनैतिक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Election: झेडपी निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार, आयोगाकडून महत्त्वाची माहिती

Street style pav bhaji recipe: घरच्या घरी कशी बनवाल स्ट्रीट स्टाईल पाव भाजी? पाहा सोपी रेसिपी

Video: 'सह्याद्री'ही हेलावला, अलोट गर्दीने फोडला हंबरडा! शरद पवारांनी दिला अजित पवारांना अखेरचा निरोप

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Face Care: पिंपल्स, पोअर्स कायमचे दूर होतील; महागड्या ट्रिटमेंटपेक्षा वापरा 'हा' होममेड फेसपॅक

SCROLL FOR NEXT