Assam Crime News  Saam Tv
क्राईम

Crime: जत्रेत अपरहण करून सामूहिक बलात्कार, गुंगीचे औषध देत १६ वर्षीय मुलीच्या शरीराचे लचके तोडले

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित मुलगी जत्रा पाहण्यासाठी गेली असता तिचे अपहरण करण्यात आले होते. तिच्यावर चौघांनी आळीपाळीने बलात्कार केला.

Priya More

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

  • अपरहण करून आणि गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार करण्यात आले

  • चार तरुणांनी या मुलीसोबत भयंकर कृत्य केले

जत्रा पाहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलीचं अपरहण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील एका गावात घडली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींमधील एक जण अल्पवयीन आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली तर एकाला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या नातेवाईकांसोबत जत्रा पाहण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिच्या कुटुंबातील सदस्य जत्रेतील पाळण्यात बसले. पाळण्यात बसल्यावर चक्कर येत असल्याने पीडित मुलगी नातेवाईकांसोबत पाळण्यात बसली नाही. ती खालीच उभी राहिली. पाळण्यात बसून झाल्यानंतर पीडित मुलीचे कुटुंबीय परत आले पण ती त्या ठिकाणी नव्हती. यावेळी दोन तरुणांनी मुलीचे अपरहण केले आणि तिला कारमध्ये बसवून नेले. आरोपींनी पीडित मुलीला गुंगीचे औषध पाजून तिला सोबत नेल्याचा आरोप केला जात आहे.

आरोपींनी पीडित मुलीचे अपहरण केले. त्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यावेळी आणखी दोन जण त्याठिकाणी पोहचले. त्यांनी देखील पीडित मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर ती घटनास्थळापासून ५ किलोमीटर अंतरावर अस्वस्त अवस्थेत आढळून आली. पीडित मुलीने कुटुंबीयांना तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT