Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: १५ वर्षीय मुलीवर म्हाताऱ्याकडून बलात्कार, जीवे मारण्याची धमकी देत...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी ६५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

१५ वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील चांदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ६ सप्टेंबरला सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घरातील सामान खरेदी करण्यासाठी निघाली होती. त्यावेळी ती राहत असलेल्या परिसरातच राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने तिला घरी बोलावले. आरोपी तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. अब्दुल समद असे आरोपीचे नाव आहे.

पीडितेचा छोटा भाऊ अनस आणि त्याचा मित्र सादान त्याठिकाणावरून जात होते. त्यांनी आरोपी अब्दुल त्याच्या बहिणीवर बलात्कार करत असल्याचे पाहिले. दोघांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये काढला. हा व्हिडीओ त्याने आपल्या वडिलांना दाखवला. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यांनी पीडित मुलीची विचारपूस केली असता तिने संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला.

पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी आमच्या घरी आला आणि त्याने आम्हाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आमचे कुटुंब दहशतीखाली होते. त्यानंतर आम्ही पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उपसरपंचाच्या डोक्यात गोळी लागली, कारमध्ये आढळला मृतदेह; बीडमध्ये धक्कादायक घटना

गृहमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही – अतुल लोंढे यांची टीका|VIDEO

Gen Z सोशल मीडियावर सर्वाधिक काय पाहतात?

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

Kacchya kelyachi Bhaji Recipe: झटपट बनवा कच्च्या केळ्याची खमंग भाजी!

SCROLL FOR NEXT