Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: १२ दिवस ओलिस ठेवत अल्पवयीन मुलीवर गँगरेप, मैत्रिणीच्या वडिलांसह तिघांचं भयंकर कृत्य

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीचा घात केल्याची घटना घडली. मैत्रिणीच्या वडिलांनी मित्रांसह १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली तर दोघे फरार आहेत.

Priya More

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

  • मैत्रिणीच्या वडिलांसह तिघांनी केलं भयंकर कृत्य

  • मैत्रिणीनेच या मुलीचा घात केला

  • कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन आणि १२ दिवस ओलिस ठेवत आरोपींनी हे कृत्य केले

उत्तर प्रदेशमध्ये १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या वडिलांनी आणि मित्रांसोबत हे भयंकर कृत्य केले. पीडित मुलगी १३ नोव्हेंबरला घरातून गायब झाली होती. २५ नोव्हेंबरला ही मुलगी एका आरोपीच्या घरामध्ये बेशुद्धावस्थेत सापडली होती. त्यानंतर या मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना सर्वांना सांगितली. त्यावेळी सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.

पीडित मुलीच्या मैत्रिणीने कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला प्यायला दिले होते. त्यानंतर मैत्रिणीच्या वडिलांसह त्यांच्या मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या तर उर्वरीत आरोपींचा शोध घेत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.

पीडित मुलीच्या वडिलांना किडनीशी संबंधित आजार आहे. त्यामुळे तिची आई एकटीच काम करून मुलांचा सांभाळ करते. १३ नोव्हेंबर रोजी त्याची १४ वर्षांची मुलगी अचानक घरातून गायब झाली. त्यांनी तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. २५ नोव्हेंबर रोजी त्यांची मुलगी गांधी बाजार येथील रहिवासी असलेल्या नरेशच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. शुद्धीत आल्यानंतर पीडितेने तिच्या आईला जे सांगितले ते ऐकून त्यांना धक्का बसला.

पीडित मुलीने आईला सांगितले की, तिच्या मैत्रिणीने तिला तिच्या घरी बोलावले होते जिथे तिने तिला कोल्ड ड्रिंक दिले होते. ते प्यायल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिच्या मैत्रिणीचे वडील आशिष यांनी त्याचे मित्र नरेश आणि हेमंत या दोघांना फोन करून बोलावून घेतलं होतं. या तिघांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने पोलिसात तक्रार दिली तेव्हा पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही.

पीडितेने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात अनेक वेळा धाव घेतली. पण तक्रार दाखल न झाल्याने तिने पोलिस अधीक्षक कुंवर ज्ञानेंद्र सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी हेमंत आणि नरेश यांना अटक केली. मुख्य आरोपी म्हणजेच पीडितेची मैत्रीण आणि वडील हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल. विविध बाबी लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ४ विशेष उपनगरीय सेवा चालवणार

Friday Horoscope : तुमच्या साधेपणाचा दुसरा कोणी फायदा घेण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांनी काळजीपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा

शिंदे वर्षावर जाऊन फडणवीसांची मालिश करता का? संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल|VIDEO

Pastry: ओव्हनची काय गरज कुकरमध्येच बनवा टेस्टी न्यू इयर स्पेशल पेस्ट्री केक, वाचा सोपी रेसिपी

Bajrang Dal Vandalism Mall: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा राडा; धर्म विचारून रायपुरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये तोडफोड

SCROLL FOR NEXT