Bijnor tragedy – BSF jawan ends life with son in Ganga days after wife’s death saamtv
क्राईम

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीचा मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

BSF Jawan Jumps into Ganga : उत्तर प्रदेशमधील बिजनोरमध्ये एक धक्कदायक घटना घडलीय. पत्नीने आत्महत्या केल्याच्या सहाव्या दिवशी पतीने त्याच गंगा नदीत उडी मारत आत्महत्या केलीय.

Bharat Jadhav

  • बिजनोरमध्ये बीएसएफ जवानाने पत्नीच्या मृत्यूच्या सहाव्या दिवशी गंगेत उडी मारून आत्महत्या केली.

  • जवानाने आपल्या दीड वर्षाच्या मुलालाही सोबत घेतलं.

  • पत्नीने पाच दिवसांपूर्वी गंगेत उडी मारून आत्महत्या केली होती.

  • कौटुंबिक वाद, हुंड्याचे आरोप आणि नैराश्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.

हसत्या खेळत्या कुटुंबात एक वादाची ठिगणी पडली अन् सार संपलं. तीन वर्षापूर्वी प्रेम विवाह केलेल्या बीएसएफ जवानाचं संसार क्षुल्लक कारणामुळे उद्धवस्त झालाय. घरागुती वाद झाल्यानंतर पाच दिवसापूर्वी जवानाच्या पत्नीने गंगेत उडी घेतली होती. तिचा अद्याप पत्ता लागला नाहीये. त्यानंतर त्याच्या सासरच्यांनी त्याच्यावर हुंडा मागितल्याचा आरोप लावला. त्या घटनेमुळे बीएसएफ जवान नैराश्यात गेला होता त्या नैराश्यापोटी पत्नीच्या मृत्यूच्या सहाव्या दिवशी बीएसएफ जवानाने त्याच गंगेत उडी मारत जीवन यात्रा संपवली.

गंगेत उडी घेताना त्याने आपल्या दीड वर्षाच्या पोराला छातीशी लावलं आणि जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पोलिसांकडून गंगा नदीच्या पाण्यात दोघांचा शोध घेतला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास, एक तरुण त्याच्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन गंगा बॅरेज पुलाच्या गेट क्रमांक १७ वर टॅक्सीने आला.

त्याने आधी चप्पल काढली आणि नंतर खिश्यातून मोबाईल काढला तो चप्पलांजवळ ठेवला. कोणालाही काही समजण्याआधी त्याने आपल्या मुलाला मिठी मारली आणि रेलिंगवर चढत गंगेत उडी मारली. एका टॅक्सी चालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो त्या जवानाला पकडू शकला नाही. या घटनेनंतर तेथे स्थानिकांची गर्दी झाली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

दरम्यान ओळखपत्रावरून बीएसएफ जवानाची ओळख पटली. गंगेत उडी मारणारा जवान नजीबाबाद येथील वेद विहार कॉलनी येथील रहिवाशी होता. बीएसएफ जवानाचे नाव राहुल होतं तो २८ वर्षाचा होता. त्याच्यासोबत त्याचा दीड वर्षाचा मुलगा प्रणव होता. या घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी जवानाच्या घरच्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

बिजनोर शहर आणि रामराज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मोटार बोटीच्या मदतीने बीएसएफ जवान आणि त्याचा मुलगा प्रणव यांचा शोध घेत होते, परंतु संध्याकाळपर्यंत त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आणि त्याची पत्नी मनीषा यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. काही काळ सर्व काही ठीक होते पण हळूहळू ते छोट्या छोट्या गोष्टींवरूनही त्यांच्यात भांडणे होऊ लागली होती.

राहुल हा अहमदाबादमध्ये तैनात होता. मार्चमध्ये तो एका महिन्याच्या रजेवर आला होता. या काळात त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्याने त्याची रजा पाच महिन्यांनी वाढवली होती. पाच दिवसांपूर्वी राहुल आणि मनीषानेमध्ये वाद झाला होता, त्यानंतर त्याची पत्नी मनिषाने गंगेत उडी मारली होती, ज्याचा शोध अजूनही सुरू आहे. दरम्यान त्याने घटनेनंतर मनिषाच्या कुटुंबियांनी राहुलवर हुंडा मागितल्याचा आरोप केला होता. त्यामुळे तो दुखात होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापुरात गणेशोत्सवासाठी मोफत बस सेवा

BJP Mumbai President : BMC निवडणुकीआधी भाजपची मोठी घोषणा, मुंबई भाजप अध्यक्ष निवडला, कुणाला मिळाली संधी?

सिंहगडावरून खाली कोसळला, CCTVच्या मदतीनं गायकवाडला शोधलं, ५ दिवस नेमका कुठे होता? पोलिसांना वेगळाच संशय

Bhiwandi Traffic : भिवंडीमध्ये वाहतुकीत मोठा बदल, शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

Pranit More : 'महाराष्ट्रीयन भाऊ'ची 'Bigg Boss 19'च्या घरात धमाकेदार एन्ट्री, कोण आहे प्रणित मोरे?

SCROLL FOR NEXT