Agra police busts sextortion racket: BJP leader among three arrested for blackmailing youth with obscene video. saam tv
क्राईम

Shocking ! भेटायला बोलवून मुलाचे कपडे उतरवले; नंतर बनवला अश्लील व्हिडिओ मग..., घटना वाचून उडेल थरकाप

Agra Police Busts Honeytrap Racket: आग्रा पोलिसांनी हनीट्रप करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. हॉटेलमध्ये एका तरुणाचा अश्लील व्हिडिओ दाखवून त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश पोलिासांनी केलाय.

Bharat Jadhav

  • आग्र्यात अश्लील व्हिडिओ बनवून तरुणाला ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.

  • आरोपींनी तरुणाकडून १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

  • पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यात भाजप नेत्याचाही समावेश.

आग्रा येथे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अश्लील व्हिडिओ बनवून तरुणाला ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय.पोलिसांनी तिघांना अटक करून तुरुंगात पाठवलं आहे.अटक केलेल्या आरोपींपैकी एक भाजप नेता असल्याचेही सांगितले जात आहे.अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पदार्फाश केलाय.

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका मुलाचा अश्लील व्हिडिओ बनवून त्याला ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी तपास करत पोलिसांनी टोळीचा पदार्फाश करत तीन जणांना अटक केलीय. एका मुलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका मुलाला हॉटेलला भेटायला बोलवलं त्यानंतर त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून मुलीने १० लाख रुपयांची मागणी केली होती.

आवास विकास कॉलोनी सेक्टर आठ येथे राहणाऱ्या एका मुलाची फेसबूकवर एका मुलीशी ओळख झाली होती. दोघांची मैत्री झाल्यानंतर त्या मुलीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढळलं. लग्नाचे आमिष दिलं. त्यानंतर पीडित मुलगा फेसबूकवरील मैत्रिणीला भेटायला गेला. तेथे त्याला नशेचं पदार्थ प्यायला दिलं. त्यानंतर मुलीने त्या मुलाचे कपडे उतरवले आणि त्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याला ब्लॅकमेलिंग करत त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आलीय.

याप्रकरणी पीडित मुलाने पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार, पोलिसांनी शकील, विराट, पिंकी, मनीष सहानी आणि जैन हॉटेलचे कर्मचारी आणि संचालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुरुवारी शकीलला तुरुंगात पाठवले आहे. या प्रकरणात मथुरा येथील रहिवासी पिंकी, मनीष सहानी आणि विराट यांनाही अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे, असे निरीक्षक न्यू आग्रा राजीव त्यागी यांनी सांगितले.

मनीष सहानी हे भाजप अल्पसंख्याक आघाडीचे माजी पदाधिकारी आहेत. दरम्यान अटकेत असलेल्या याआधीही अनेकांना हनीट्रपचा शिकार बनवलंय. या गँगने अनेकांचे असे अश्लील व्हिडिओ हवून त्यांच्याकडून खंडणी वसूल केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT