UP Crime News Saam Digital
क्राईम

UP Crime News: संशयाचं भूत शिरलं, पत्नीचं शीर धडावेगळं केलं; बाराबंकीतील थरकाप उडवणारी घटना

UP Crime News: अनैतिक संबंधातून पतीने पत्नीची हत्या करून शीर धडावेगळं केलं आणि धडावेगळं केलेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे.

Sandeep Gawade

UP Crime News

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून एक हृदयद्रावक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून पतीने पत्नीची हत्या करून शीर धडावेगळं केलं आणि धडावेगळ केलेले हे शीर थेट पोलीस ठाण्याकडे निघाला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला वाटेतच गाठलं आणि अटक केली. दरम्यान थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. अनिल कुमार कनोजिया असं या माथेफीरू पतीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसरा गावात घडली आहे. दोघांचेही आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि अनेक वर्षांपासून ते कुटुंबापासून वेगळे राहत होते. त्यांना एक चार वर्षांचा मुलगाही आहे. दरम्यान अनिलला त्याच्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरून पती-पत्नीमध्ये दररोज वाद होत असत. काही दिवसांपूर्वी दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. मात्र पोलिसांनी दोघांची समजूत काढून घरी पाठवलं होतं. मात्र मनातल्या संशयाने अनिल ला विकृत बनवल होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान आज अनिलचा काही वेगळाच प्लॉन होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही वेगळचं सांगत होते. नेहमीप्रमाणे तो कामावर गेला होता, मात्र काही वेळातच तो घरी परतला. पत्नीने कामावरून लवकर घरी येण्याचं कारण विचारलं पण काहीही उत्तर न देता तो तिला घरात घेऊन गेला आणि बाहेर आला त्यावेळी त्याच्या हातात पत्नीचे शीर होतं. अनिलने पत्नीची हत्या करून तीचं शीर धडावेगळ केलं होतं. घरात रक्ताच्या थारोळ्यात तिचं शीर नसलेल धड पडलेलं होतं. विकृत अनिलने आता पत्नीचं शिर घेऊन पोलीस ठाण्याकडे निघाला होता.

खाली मान घालून कोणाचं तरी शीर हातात घेऊन जाणारी व्यक्ती पाहून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्याही अंगाचा थरकाप उडाला. बघता बघता बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावात एकच घबराट उडाली. काही नागरिकांनी यांची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला रस्त्यातच गाठलं. समोरचं दृष्य पाहून पोलीसही चक्रावले. लागलीच पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्या पत्नीचं शीर ताब्यात केलं.

पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतरही अनिलच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची पश्चातापाची अथवा अपराधाची भावना नव्हती. त्याला घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले. घरात ताटातील अन्न संपूर्ण घरभर पसरलं होतं आणि रक्ताच्या थारोळ्यात अनिलच्या पत्नीचा मृतदेह पडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT