Uttar Pradesh Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : धक्कादायक! तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पोलिसाच्या कृत्याने संताप, २ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशात दोन पोलिसांनी चार्जशीट दाखल करण्यासाठी महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • यूपीच्या बोलिया जिल्ह्यात पोलिसांचा धक्कादायक प्रकार

  • चार्जशीटसाठी महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी

  • पीडितेने कॉल रेकॉर्डिंगसह तक्रार दाखल केली

  • दोन पोलिसांना निलंबित करून तपास सुरू

Uttar Pradesh Police Sexual Demand From Women पोलीस हे जनतेचे रक्षक मानले जातात. मात्र हेच पोलीस भक्षक होत असतील तर त्यांच्यावर देखील समान कायदा लागू करून शिक्षा करणं गरजेचं आहे. आजच्या घडीला देशभरात लाचखोरी, बलात्कार, अशा अनेक प्रकारांमध्ये पोलिसांचाही हात असल्याचं काही प्रमाणावर आढळून येत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बोलिया जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिलेकडे चार्जशीट दाखल करण्यासाठी दोन पोलीस अधिकाऱ्यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. या धक्कादायक मागणीनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा वन विभागात कार्यरत असलेल्या एका उपनिरीक्षकाशी हिंदू रितीरिवाजानुसार एका मंदिरात विवाह झाला होता. त्यानंतर आरोपीने सुमारे आठ महिने तिचे लैंगिक शोषण केले. मात्र जेव्हा तिने कोर्ट मॅरेजसाठी त्याच्यावर दबाव टाकला, तेव्हा त्याने तिला नकार दिला. यानंतर, त्या महिलेने त्याच्या विरोधात फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी चार्जशीट लावण्यासाठी महिलेने पोलिसांकडे मागणी केली असता संबंधित दोन पोलीस अधिकाऱ्यांनी पिडीतेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. या संवादाचे कॉल रेकॉर्डिंग पोलीस ठाण्यात पुरावा म्हणून सादर करत महिलेने सदर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी आता नराधम दोन पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. महिलेने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस युनिरीक्षक चांगलाच गोत्यात येणार आहे. याप्रकरणी पुढील सखोल तपास सुरु असून जनतेचा रक्षकच भक्षक बनल्याने सर्वसामान्यांनी न्यायासाठी कोणापुढे हात पसरावे? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT