Haryana firing Saam Digital
क्राईम

Haryana firing : हरियाणात पुन्हा गोळीबार; व्यावसायिकाची १५ गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Haryana firing Crime news : हरियाणात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना घडली. हरियाणातील रोहतक भागात एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्याची घटना घडली. अज्ञातांनी व्यावसायिकावर १५ ते १६ गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Haryana firing Case :

हरियाणात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना घडली. हरियाणातील रोहतक भागात एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्याची घटना घडली. अज्ञातांनी व्यावसायिकावर १५ ते १६ गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. या घटनेत व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणात ४० वर्षीय मुंजाल नावाच्या व्यावसायिकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तो कुटुंबासोबत एका लग्न समारोहाला जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यात एका हॉटेल जेवण करण्यासाठी थांबला.

रोहतक जवळील हॉटेलमध्ये तीन ते चार अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी व्यावसायिकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ४० वर्षीय व्यावसायिकाच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर रोहित गोदारा आणि लाँरेन्स बिष्णोई गँगने घेतली आहे. मृत व्यावसायिकाचा भाऊ अमित मुंजाल आणि त्याचा मित्र दीपकने सांगितलं की, लाखन माजरा जवळील एक हॉटेलवर काही अज्ञातांनी गोळीबार करत व्यावसायिक मुंजालची हत्या केली.

मृत मुंजाल आधी बुकीचं काम करायचा. त्यानंतर प्रॉपर्टी संबंधित काम करू लागला होता. दीपकने सांगितलं की, दोन-तीन वर्षापूर्वी त्याच्या बिझनेस पार्टनरचीही गोळ्या झाडून हत्या केली होती.

पोलिसांकडून तपास सुरु

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या वर्षापासून व्यावसायिकाला जिवे मारण्यासंबंधित धमक्यांचे फोन येत होते. व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार करूनही त्यावेळी कारवाई झाली नव्हती. आता गँगस्टर रोहित गोदाराने सोशल मीडियावर पोस्ट करत हत्येची जबाबदारी घेतली आहे. या घटनेत व्यावसायिकाची आई आणि मुलगा जखमी झाला आहे . त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर डॉक्टरांनी व्यावसायिकाला मृत घोषित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डीत बोगस मतदारांचा आकडा 15 हजारांपर्यंत जाईल - बाळासाहेब थोरात

तुमच्या घरातील किचनसाठी कोणता रंग लकी आहे?

Bhau Beej 2025: संध्याकाळी भाऊबीज करावी की नाही? आजच्या दिवसाचे शुभ मुहूर्त काय

Kolhapur: मध्यरात्री ८ ते १० तरुण गावभर फिरले, नंतर रस्त्याच्या मधोमध केली अघोरी पूजा; धक्कादायक VIDEO समोर

Singer Passes Away: प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT