Thane Ulhasnagar Crime news AI Photo
क्राईम

Thane Crime : पोलिसांनी दिले गुड टच, बॅड टचचे धडे अन चिमुकलीनं फोडलं बापाचं बिंग!

Thane Crime News: पोलिसांनी दिले गुड टच, बॅड टचचे धडे अन् त्याचवेळी चिमुकलीनं बापाचं बिंग फोडलं. नराधम बाप पोटच्या मुलीवर बलात्कार करत असल्याचं समोर आले अन् ठाण्यातील उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली.

Namdeo Kumbhar

अजय दुधाणे

Thane Ulhasnagar Crime news : ठाण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम बापच पोटच्या पोरीवर अत्याचार करत असल्याचं प्रकरण ठाण्यातील उल्हासनगरमधून समोर आले आहे. पत्नीपासून विभक्त झालेला नराधम मुलीवर अत्याचार करात होता. पोलिसांनी दिले गुड टच, बॅड टचचे धडे दिले, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईच्या तक्रारीवरून पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये पोलीस एका शाळेत विद्यार्थिनींना गुड टच, बॅड टचचे धडे द्यायला गेले, ते ऐकून एका चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं अन तिनं याबाबत शिक्षिकेला सांगताच या नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

उल्हासनगरात आरोपी बाप हा त्याच्या दोन मुलींसह वास्तव्याला असून त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली आहे. यानंतर आपल्या मोठ्या मुलीच्या बाल अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यानं तिला वासनेची शिकार केलं होतं. अशातच या मुलीच्या शाळेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांकडून एका शाळेत गुड टच आणि बॅड टचची माहिती देण्यात आली. ते ऐकून या चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं.

याबाबत तिने शिक्षिकेला माहिती दिल्यानंतर शिक्षिकेनं पोलिसांच्या मदतीनं तिच्या आईला ही बाब सांगितली. याबाबत आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या नराधम बापाविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. यानंतर मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला असून बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवांची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

SCROLL FOR NEXT