vitthalwadi crime news Saam Tv
क्राईम

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये काय चाललंय? भरवस्तीत दोघांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

अजय दुधाणे

Ulhasnagar Crime News:

उल्हासनगरमधून धक्कादायक घटनासमोर आली आहे. उल्हासनगरमध्ये आज शुक्रवारी भरवस्तीत दोघांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघेही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रककरणी उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक चार येथील बंजारा पाडा येथील सायंकाळच्या सुमारास दोघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. चॉपर, कोयता आणि बिअरच्या बॉटलने दोघांवर हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक चार येथील भरवस्तीत दोघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे अमोल साबळे आणि सुमित शिंदे अशी आहे.

या दोघांना उपचारासाठी उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी पाटविण्यात आले आहे. उल्हासनगरमध्ये सायंकाळाच्या सुमारास झालेल्या घटनेमुळे कायदा सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला जात आहे.

तरुणाच्या डोक्यावर लोखंडी फावड्याने मारहाण करून हत्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात एका ३२ वर्षीय तरूणाचा तोंड आणि डोक्यावर लोखंडी फावड्याने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कृष्णा एकनाथ डोळस असे मृत तरूणाचे नाव असून पैठण शहरातील लक्ष्मीनगर येथील ही घटना आहे.

कृष्णा डोळस याला दारूचे व्यसन होते. कृष्णा दारू पिऊन आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचे सतत भांडण व्हायचे. या कारणामुळे लक्ष्मीनगर येथे तो एकटाच राहत होता. अज्ञाताने कृष्णा डोळस याच्या तोंड आणि डोक्यावर लोखंडी फावड्याने प्रहार करून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Nakshatra Parivartan: पुढील २ महिने 'या' राशींची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश

Lapsi Recipe : अस्सल पुणेरी आणि मऊ लापशी; या टिप्सने बनवाल तर लहान मुलं मिनिटांत ताट रिकामं करतील

Marathi News Live Updates : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'ची ऑफर स्वीकारणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर मराठमोळ्या अभिनेत्रीचं एका वाक्यात उत्तर

Shocking Video: धावती ट्रेन पकडणं अंगलट, तरुण मरता-मरता वाचला; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT