ulhasnagar news saam tv
क्राईम

Ulhasnagar Crime: उल्हासनगर हादरले! मध्यरात्री भरचौकात गोळीबाराचा थरार, दोघे गंभीर जखमी

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून रक्तरंजित गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. साईनाथ कॉलनी परिसरातील या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

Alisha Khedekar

  • उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीत बुधवारी रात्री गोळीबाराची घटना घडली.

  • कौटुंबिक वादातून मोनू शेखने योगेश मिश्रावर गोळीबार केला; दोन जण जखमी.

  • योगेश मिश्रा गंभीर जखमी असून त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

उल्हासनगर शहरात बुधवारी रात्री उशिरा कौटुंबिक वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प पाचमधील साईनाथ कॉलनी परिसरात झालेल्या या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू शेख याचा काही काळापासून योगेश मिश्रा यांच्याशी कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. या वादातूनच आरोपीने बुधवारी रात्री योगेश मिश्रा यांच्यावर थेट गोळीबार केला. गोळी लागल्याने योगेश मिश्रा गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यात दुसऱ्या एका व्यक्तीवर तलवारीने प्राणघातक वार करण्यात आले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे साईनाथ कॉलनी परिसरात मोठा गोंधळ उडाला.

दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे जमा केले. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, फरार आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या योगेश मिश्रा यांना तातडीने ठाण्यातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दुसऱ्या जखमी व्यक्तीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद केली असून तपास अधिकाऱ्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Morcha: मोर्चासोबत बीडवरुन पुण्यात आले; मनोज जरांगेंच्या कट्टर समर्थकाचा मृत्यू, देशमुख आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update: अरूण गवळीला सुप्रिम कोर्टातून जामीन मंजूर

Ganesh Chaturthi 2025: गौरी- गणपती यांच्यात नातं काय आहे?

Pune Crime : काम व्यवस्थित कर... सततच्या सूचनांना कंटाळला, वैतागलेल्या वेटरनं हॉटेल चालकाला संपवलं

Hansal Mehta: टोरंटोमध्ये 'गांधी' वेब सिरिजच्या प्रदर्शनापूर्वी हंसल मेहता यांना मोठा धक्का, सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT