Crime News Saam tv
क्राईम

Ulhasnagar Crime: २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झुडपात फेकला; भयंकर घटनेने उल्हासनगर हादरलं!

Ulhasnagar Crime: विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीत मानेरे गाव रोडवर असलेल्या एस एस टी कॉलेज समोर ही हत्या झाली.

अजय दुधाणे

Ulhasnagar Crime News:

उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये विठ्ठलनगर पोलिसांच्या हद्दीत एसटी कॉलेजसमोर २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Crime News In Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) मध्यरात्री स्वप्निल कानडे या २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीत मानेरे गाव रोडवर असलेल्या एस एस टी कॉलेज समोर ही हत्या झाली. हत्येनंतर मृतदेह झुडपात तरुणाचा मृतदेह फेकण्यात आला असल्याचे समोर येत आहे. स्वप्निल कानडे हा कृष्णा नगर मध्ये राहायचा.

ही हत्या जुन्या वादातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर स्वप्निलचा मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांना काही धागेदोरे सापडले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

नवविवाहित दांपत्याची निर्घृण हत्या..

घरच्यांच्या इच्छेविरोधात प्रेमविवाह केल्याने लग्नाच्या ३ दिवसांनंतर नवविवाहित जोडप्याची हत्या करण्यात आली. तामिळनाडूमध्ये ही हादरवुन टाकणारी घटना घडली आहे. ही हत्या कुणी केली, हे स्पष्ट झाले नसून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या हत्यांकांडाचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

Puja Mistakes: पुजा करताना 'या' चुका करु नका, अन्यथा देवी-देवता होतील नाराज

प्रांत ऑफिससमोर आंदोलन; संगमनेरमध्ये पोलीस आणि शेतकरी आमनेसामने, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Marathwada University : ५५ महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित; शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय

अमरावतीत राजकीय भूकंप! रवि राणांच्या पक्षाची ताकद वाढली, काँग्रेससह इतर पक्षातील बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT