two youth seriously injured after fighting with each other in parnda near dharashiv Saam Digital
क्राईम

Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यात भरदिवसा गाेळीबार; वाळू माफियांच्या दाेन गटात राडा

two youth seriously injured after fighting with each other in parnda near dharashiv: पाेलिसांनी घटनेनंतर संशयितांच्या शोधासाठी धाराशिव जिल्ह्यात पथके रवाना केलीत.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

धाराशिव जिल्ह्यात वाळू माफीयांच्या दाेन गटात तुफान राडा झाला. यावेळी काहींनी गाेळीबार देखील केला. या राड्यात दाेघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पुर्व वैमनस्यातून प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून घटनेचा तपास सुरु आहे.

परंडा पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात आज (शनिवार) वाळु व्यावसायिकांच्या दोन गटात राडा झाला. यावेळी गोळीबार देखील झाला. योगेश हनुमंत बुरंगे याच्या कमरेला गाेळी लागली. त्यामुळे याेगेश गंभीर जखमी झाला.

याेगेश यास बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या राड्यात कपील आजिनाथ अलबत्ते यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते देखील जखमी झाले आहेत. या घटनेतील संशयित आरोपी चैतन्य शेळकेसह दोघे जणांचा पोलिस शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

SCROLL FOR NEXT