Police constable’s daughter Sarika Shikare dies by suicide in Tuljapur after threats from accused demanding love and marriage. saam TV News
क्राईम

Tuljapur Tragedy: "माझ्यावर प्रेम कर नाहीतर...", छेडछाडीला कंटाळून पोलिसाच्या मुलीनं गळफास घेतला

Tuljapur harassment case : तुळजापूरमध्ये पोलिसाच्या १५ वर्षीय मुलीने छेडछाड व धमकीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. "प्रेम कर नाहीतर सोशल मीडियावर बदनामी करीन" अशा धमक्यांमुळे मुलीने गळफास लावून आत्महत्या केली.

Namdeo Kumbhar

बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी

Tuljapur Crime News : तुळजापूरमध्ये छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माझ्या प्रेम कर, लग्न कर नाहीतर... असे म्हणत आरोपीकडून तिला वारंवार धमकी देण्यात येत होती. त्यामुळे १५ वर्षीय सारिका शिकारे हिने टोकाचा निर्णय घेतला. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

तुळजापूरमधील शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनीत राहणाऱ्या १५ वर्षीय सारिका शिकारे या पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने छेडछाड आणि धमकीला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारिकाच्या आईच्या फिर्यादीनुसार, आरोपी ओंकार कांबळे आणि नगिना शशिकांत पांडागळे यांनी सारिकाला सातत्याने त्रास दिला. ओंकारने सारिकाला "माझ्यावर प्रेम कर, लग्न कर, नाहीतर सोशल मीडियावर तुझी बदनामी करेन" अशी धमकी दिली होती. तसेच, त्याने बंदुकीने मारण्याची धमकी देखील दिली होती. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून सारिकाने टोकाचा निर्णय घेतला.

ओंकार कांबळे याच्यावर यापूर्वीही सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

SCROLL FOR NEXT