WB TMC Leader Saam Tv
क्राईम

WB TMC Leader : तृणमूल काँग्रेस नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

Bharat Jadhav

TMC leader Satyen Chaudhary shot Dead :

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्येमध्ये टीएमसी नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या झालीय. हत्येची घटना रविवारी दुपारी बहारमपूरच्या चलटिायामध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर दुचाकीवर आले होते. टीएमसी नेते चौधरी यांच्या जवळ येत त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.(Latest News)

मिळालेल्या माहिततीनुसार सत्येनही अधीर रंजन चौधरी यांचे निकटवर्तीय होते. परंतु काही वर्षांपूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये ( Trinamool Congress) प्रवेश घेतला होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सत्ताधारी पक्षापासून अलिप्त झाले होते. हल्लेखोर त्यांच्याजवळ जाऊन चौधरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारात (Shoot) जखमी झाल्यानंतर त्यांना मुर्शिदाबाद येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सत्येन चौधरी हे बहरामपूर येथील भाकुरी येथील एका पारावर आपल्या समर्थकांशी चर्चा करत होते. त्यावेळी दुचाकीवर काही लोक आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. चौधरी यांना वाचवण्यासाठी लोकं येईपर्यंत हल्लेखोर तेथून पसार झाले होते. गोळीबारात जखमी झालेल्या चौधरींना मुर्शिदाबादमधील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं होतं, परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, डाव्या विचारसरणीचे सरकार असताना चौधरी यांना अनेकवेळा तुरुंगात जावे लागले होते.

सत्येन चौधरी यांचीही काँग्रेसमधील प्रभावी नेते म्हणून गणना होत होती. तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना जिल्हा सरचिटणीसपद देण्यात आले. मात्र काही काळापासून ते राजकारणापेक्षा व्यवसायात अधिक सक्रिय होते. ते हळूहळू राजकारणापासून दुरावा घेत होते. मागील विधानसभा निवडणुकीत सत्येन चौधरी हे सक्रीय नव्हते. सत्येन यांची हत्या काँग्रेसच्या विचारसरणीच्या लोकांनी केल्याचा आरोप काही लोक करत आहेत. तर सत्येन यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT