Nashik Crime Google
क्राईम

Nashik Crime: नाशिकमध्ये दिवसाढवळ्या थरार! हॉटेल व्यावसायिकाचं अपहरण, १ कोटींची खंडणी मागितली

Kidnapping Case: नाशिकमध्ये भरदिवसा एका हॉटेल व्यावसायिकाच्या अपहरणाची फिल्मी स्टाईल घटना घडली. या धक्कादायक प्रकारामुळे शहरातील सुरक्षेवर आणि पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Dhanshri Shintre

नाशिक शहरात भरदिवसा घडलेल्या अपहरणाच्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. एका हॉटेल व्यावसायिकाचं अपहरण अगदी फिल्मी अंदाजात करण्यात आलं. या धक्कादायक घटनेनंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पोलिस प्रशासनालाही या घटनेनं मोठं आव्हान दिलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दुपारी ३ वाजताच्या दरम्यन नाशिकमध्ये ही थरारक घटना घडली. हॉटेल व्यावसायिक निखील दर्याणी यांच्या कारचा पाठलाग करून, सिग्नलवर गाडी थांबल्यावर काही जणांनी त्यांच्याशी बोलण्याचा बहाणा केला. अचानक पिस्तूलाचा धाक दाखवत आरोपी त्यांच्या गाडीत शिरले आणि त्यांचे अपहरण केले. हा प्रकार भरदिवसा घडल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अपहरण केल्यानंतर गाडीतच अपहरणकर्त्यांनी निखील दर्याणी यांना त्यांच्या कुटुंबीयांना कॉल करण्यास भाग पाडलं आणि १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने प्रतिसाद दिला. निखील यांचे बंधू यांनी १५ लाख रुपये तत्काळ देण्याची तयारी दर्शवत, भावाला सोडण्याची विनंती केली. या सगळ्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

१५ लाखांची रक्कम मिळाल्यानंतर अपहरणकर्त्यांनी निखील दर्याणी यांना उपनगर सिग्नलवर बोलावलं आणि पैसे स्वीकारले. त्यानंतर त्यांनी त्यांना गरवारे पॉईंटकडे नेत धूम ठोकली. मात्र, प्रसंगावधान राखत निखील दर्याणी यांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. ही बाब लक्षात येताच आरोपी घाबरले आणि कार तिथेच सोडून पसार झाले.

अपहरण प्रकरणातून सुटल्यावर निखील दर्याणी यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना केलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेची माहिती बाहेर येताच संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT