three days magistrate custody to ambadas mankape in adarsh mahila bank nagri sahkari bank case  saam tv
क्राईम

Sambhajinagar Adarsh Scam :'आदर्श' चे अध्यक्ष अंबादास मानकापेसह चाैघांना तीन दिवसांची पोलिस काेठडी

आदर्श महिला नागरी सहकारी बॅंकेतील लेखापरीक्षणात चाळीस कोटींचा घोटाळा समोर आला होता. त्यावरून डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर येथील बहुचर्चित आदर्श महिला नागरी सहकारी बॅंकेतील (adarsh mahila bank nagri sahkari bank aurangabad) 48 कोटीचा अपहार केल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अंबादास मानकापे (ambadas mankape) यासह चाैघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Maharashtra News)

आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत 48 कोटींचा अपहार केल्याचा ठपका अंबादास मानकापे यासह अन्य संचालकांवर आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हसूल कारागृहातून नुकतेच चाैघांना ताब्यात घेतले. यामध्ये अंबादास मानकापे, सुनंदा अनिल पाटील, सुनील अंबादास पाटील आणि नामदेव कचकूरे यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 मध्ये झालेल्या लेखापरीक्षणात सुरुवातीला चाळीस कोटींचा घोटाळा समोर आला होता. त्यावरून डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्हा अंतर्गत त्यांना हरसुल कारागृहातून आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत न्यायालयात हजर केले हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT