Nashik Crime saam Tv
क्राईम

Nashik Crime : घरात लग्नाची तयारी, अख्खं कुटुंब गेलं होतं बाहेरगावी; परतल्यावर घरातलं दृश्य बघून सर्वच हादरले

Nashik Crime : सातपूर कॉलनीमध्ये महाले यांच्या घरात लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. यासाठी तयारी करण्यात येत होती. लग्न समारंभासाठी घरात रोख रक्कम आणि सोन्याची दागिने आणले होते. महाले कुटुंबीय जेव्हा परगावी गेले होते, त्यावेळी चोरांनी संधी साधत घरातील रोख रक्कम लंपास केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nashik thieves loot In Marriage house Satpur:

नाशिकमध्ये एक चोरीची घटना घडली आहे. येथेही एका घरात चोरांनी घुसखोरी करत तब्बल 19 तोळे सोनं आणि दोन लाख रुपये नगद असा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना नाशिकमधील सातपूर परिसरातील सातपूर कॉलनी येथील इच्छापूर्ती साईनाथ येथे घडली आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, येथील सातपूर कॉलनीमध्ये महाले नामक कुटुंब याच घर आहे. ते काही खासगी कामासाठी नाशिक शहरातून बाहेर गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर चोरांनी घरात तिजोरीत ठेवलेले १९ तोळे सोनं आणि दोन लाख रुपये रोख रक्कम, असा मुद्देमाल चोरून नेलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अलीकडेच महाले कुटुंबात एक लग्न कार्यक्रम पार पडला होता. या कारणामुळे घरात सोन्याचे दागिने होते. लग्न समारंभाचा कार्यक्रमा झाल्यामुळे घरात जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवणार होते. यासाठी बँकेतून रोख रक्कम देखील काढून आणण्यात आली होती. चोरांनी हीच संधी साधत लग्न घरात चोरी करत रोख रक्कम आणि दागिने लंपास केले. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा अशी मागणी पीडित आणि परिसरातील नागरिकांनी करत आहे.

दुचाकी चोरी करणारे दोन संशयित ताब्यात

नाशिक शहरात चोरांचा सुळसुळाट झालाय. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पंचवटी पोलिसांनी अटक केली होती. या चोरांकडून चोरीच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच ११ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचवटी पोलिसांनी हस्तगत केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT