theft case in mp omraje nimbalkar farm near dharashiv  Saam Digital
क्राईम

उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांच्या शेतात चाेरी, पाेलिस तपास सुरु

MP Omraje Nimbalkar : अशोक साठे यांनी दिलेल्या तक्रारीनूसार ढाेकी पाेलिसांनी अज्ञातांवर गुन्हा नाेंदविला आहे. ढाेकी पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

धाराशिव जिल्ह्यात शेतीपंप, केबल, दुचाकी, दागदागिन्यांची चाेरी, घरफोड्या अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता चोरट्यांनी आता थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शेतातच डल्ला मारल्याचे समाेर आहे.

अशोक साठे यांनी दिलेल्या तक्रारीनूसार पाेलिसांनी अज्ञातांवर गुन्हा नाेंदविला आहे. साठे यांनी दिलेल्या फिर्यादीत ओमराजे निंबाळकर यांच्या शेतातील विद्युतपंपाचे 1200 रुपयांचे केबल चोरीस गेले आहे.

कोल्हेगाव शिवारातील शेतात ही चोरी झाली आहे. याबाबत अशोक साठे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदारांच्या शेतातच चोरट्यांनी डल्ला मारल्याने याची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.

तेरखेडा फटाका कारखान्यात स्फोट

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा फटाका कारखान्यात स्फोट झाला आहे. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना घडल्यानंतर आग लागली हाेती. गावकऱ्यांनी एकत्रीत प्रयत्न करुन आग विझविली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT