Thane Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : ठाणे हादरलं! कोर्टाजवळ कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, गुंगीचे औषध देऊन नको ते केलं

Thane Crime News : ठाणे फॅमिली न्यायालयाच्या परिसरात वाढदिवसाच्या केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार करण्यात आले. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा फरार आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • वाढदिवसाच्या केकमध्ये गुंगीचं औषध मिसळून केक महिलेला भरवला

  • न्यायालय परिसरात महिलेवर लैंगिक अत्याचार

  • एका आरोपीला अटक, दुसरा फरार

  • पीडित महिलेने धाडसाने पोलिसांत तक्रार दाखल केली

विकास काटे, ठाणे

ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाणे फॅमिली न्यायालयाच्या आवारात एका महिलेला तिच्या वाढदिवसाच्या केक मधून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून ठाण्यासारख्या गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या पीडित विवाहितेचा २५ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. त्या निमित्त दोन तरुण आणि पीडित महिला केक कापण्यासाठी एका कारमध्ये बसले. वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये दोन आरोपींनी गुंगीचं औषध टाकलं. तोच केक त्या महिलेला भरवला, त्यामुळे महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर दोन आरोपींनी कार ठाणे न्यायालयाच्या पार्किंग मध्ये पार्क केली.

या पार्किंगमध्येच दोन तरुणांनी महिलेवर अत्याचार केले. आणि त्याचे व्हिडिओ देखील चित्रित करण्यात आले. महिलेला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती नको त्या अवस्थेत होती. मात्र या दोघांनी तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन् तिचे तोंड बंद करण्याचे प्रयत्न केले. मात्र डगमगून न जाता महिलेने तडक पोलीस ठाणे गाठले.

घडलेला सगळा प्रकार महिलेने पोलिसांना सांगितला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी एकाला राहत्या घरातून अटक केली असून दुसरा फरार आहे. तर, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: रॉडनं मारलं, नंतर सुनेचा हात कापला; सासरा आणि पती म्हणाले, 'अधिकारी किंवा नेते कोणीही आमचं काही करू शकत नाही...'

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची ताज हॉटेलमध्ये बैठक

Trendy Hairstyle: पार्टी, फंक्शनसाठी साडीवर करा 'या' ट्रेंडी आणि सुंदर हेअरस्टाईल

Accident News: रंगरंगोटीचे काम करून जेवणाला बसले अन्...; भरधाव कारनं २० मजुरांना चिरडलं, २ जणांचा मृत्यू

निवडणुकीनंतर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रकृती अस्वस्थ; पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT