Thane Crime Update Saam tv
क्राईम

Thane Crime Update : ठाण्यात सुपरवायझरच्या भयावह हत्याकांडाचा अखेर उलगडा; त्या एका शब्दानं घात झाला!

thane supervisor killing case : ठाण्यात सुपरवायझरच्या भयावह हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. सुपरवायझरची हत्या का केली, याचा उलगडा सुरक्षा रक्षकाने पोलिसांसमोर केला आहे.

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे : ठाण्यात कोलशेत येथील एका उच्चभ्रू सोसायटीच्या टेरेसवर सुरक्षा रक्षकाने सुपरवायरची गळा चिरून हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं होतं. कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली होती. या भयावह हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. आईवरून शिवी दिल्याने सुरक्षा रक्षकाने त्याच्या सुपरवायझरला संपवल्याचा उलगडा पोलिस तपासातून समोर आला आहे.

ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीचा सुरक्षा रक्षक प्रशांत कदमने त्याच्या सुपरवायझरची मुंडकं छाटून हत्या केली होती. या हत्याकांडानंतर पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली होती. सुरक्षा रक्षकाने सुपरवायझरची हत्या केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

क्राइम सिरीज पाहून सुपरवायझरला संपवलं

या हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी प्रशांत कदमच्या मुसक्या आवळल्या होत्या. अटकेत असलेल्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांसमोर मोठा खुलासा केला. आईवरून शिवी दिल्याने मुंडके छाटल्याची कबुली आरोपी प्रशांत कदमने पोलिसांसमोर दिली. आरोपी प्रशांतने क्राइम सिरीज पाहून हत्या केली. प्रशाने क्राइम सिरीजमध्ये कशी हत्या केली, कुठून हत्यार आणले. त्या ठिकाणावरून हत्यार आणले. आरोपी प्रशांतने त्या ठिकाणावरून हत्यार आणूनच सुपरवायझर सोमनाथची हत्या केल्याचे पोलीस चौकशीत सांगितले.

आरोपी प्रशांत कदमने आधी कट रचून सुपरवायझरची हत्या केली. आईवरून कोणी शिवी की प्रशांत आक्रमक व्हायचा. सुपरवायझर सोमनाथने प्रशांतला कामावर असताना आईवरून शिवी दिली होती, असा पोलिस तपासातून समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT