Crime  SaamTV
क्राईम

Crime : साताऱ्याच्या पोरांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार

Thailand Crime News: साताऱ्याच्या दोन तरूणांनी थायलंडमध्ये जर्मन महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोघांच्या भयंकर कृत्यमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. दोघांना थायलंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Latest Crime News : महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य साताऱ्यातील दोन तरूणांनी केले आहे. साताऱ्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये बीचवर 24 वर्षीय जर्मन महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर या दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरूण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आहेत. त्यांनी थायलंडमधील बीचवर २४ वर्षीय जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केला. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरूंगात करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या घटनेमुळे सातारकऱ्याची आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.

सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोन जण थायलंड फिरण्यासाठी गेले होते. थायलंड येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच साताऱ्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये देशाची मान शरमेनं खाली जाईल, असे कृत्य केलेय. साताऱ्यातील कोरोगाव येथील दोन तरूणांनी २४ वर्षीय जर्मन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. हे दोन्ही तरूण थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेले होते. येथील रीन बीचवर (Thailand news) या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केला. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT